rajpal-yadav:

Rajpal Yadav: 'टक्कर मारली, हात उगारला, जीवे मारण्याची धमकी दिली'; राजपाल यादवविरोधात तक्रार दाखल

Rajpal Yadav

Image Credit source: Instagram

उत्तरप्रदेश: अभिनेता राजपाल यादव आणि इतरांविरोधात उत्तरप्रदेशातील प्रयागराजमधल्या कलोनलगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान विद्यार्थ्याला चुकून स्कूटीची धडक लागल्याने राजपालविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राजपाल कात्रा याठिकाणी चित्रपटाचं शूटिंग करत होता. त्यावेळी शूटिंग पाहण्यासाठी आलेल्या एका विद्यार्थ्याला राजपालच्या दुचाकीची धडक लागली. या घटनेत कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र चित्रपटाच्या टीमने गैरवर्तणूक केल्याचा आरोप करत संबंधित विद्यार्थ्याने तक्रार दाखल केली.

या घटनेप्रकरणी राजपाल यादव आणि चित्रपटाच्या टीममधील इतर सदस्यांनीही संबंधित विद्यार्थ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. प्रशा्सनाकडून परवागनी घेऊन शूटिंग करत असताना त्यात अडथळे आणण्याचं काम संबंधित विद्यार्थ्याने केल्याचा आरोप त्यांनी केला.

शूटिंगदरम्यान राजपाल चालवत असलेली स्कूटर ही खूप जुनी होती. त्यामुळे त्याच्यावरील नियंत्रण सुटून विद्यार्थ्यांना धडक लागली. मात्र या घटनेत विद्यार्थ्याला कोणतीच दुखापत झाली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. मात्र पुढील तपासानंतर कोणती कारवाई करावी हे ठरवलं जाईल, असं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं.

राजपाल यादव हा त्याच्या ‘लक्ष्मी टॉकीज’ या आगामी चित्रपटाचं शूटिंग करत होता. हे शूटिंग पाहण्यासाठी स्थानिकांनी आणि विद्यार्थ्यांनी त्याठिकाणी मोठी गर्दी केली होती. स्कूटी चालवण्याच्या सीनदरम्यान राजपालचं नियंत्रण सुटलं आणि ती स्कूटी एका विद्यार्थ्याला जाऊन धडकली. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *