Rahul Gandhi : हाड गोठवणारा गारठा तरीही राहुल गांधीना थंडी का वाजत नाही?

rahul-gandhi-:-हाड-गोठवणारा-गारठा-तरीही-राहुल-गांधीना-थंडी-का-वाजत-नाही?

राहुल गांधी सध्या दिल्लीत आहेत. दिल्लीत सहा अंशांपर्यंत तापमान खाली उतरल आहे. दिल्लीत कडाक्याची थंडी आहे. राहुल गांधींचा अशाच कडाक्याच्या थंडीतला एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. राहुल गांधींना थंडी वाजत नाही का? असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

Updated: Dec 27, 2022, 10:44 PM IST

Rahul Gandhi : भारत जोडो यात्रेच्या(Bharat Jodo Yatra) निमित्ताने राहुल गांधी देशभर फिरत आहेत. वेगवगेळ्या राज्यात फिरत असताना दौऱ्यांसह राहुल गांधींच्या(Rahul Gandhi) फिटनेसची देखील चांलीच चर्चा होत. त्यातचं आता राहुल गांधींचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. दिल्लीत हाड गोठवणारी थंडी(cold of Delhi) आहे. या कडाक्याच्या थंडीत राहुल गांधी फक्त टीशर्ट, पँटवर फिरताना दिसत आहेत.  ना शाल, ना जॅकेट ना स्वेटर.. सोशल मीडियावर राहुल यांचा थंडीतला व्हिडीओ व्हायरल(Viral video) झाला आहे.

राहुल गांधी सध्या दिल्लीत आहेत. दिल्लीत सहा अंशांपर्यंत तापमान खाली उतरल आहे. दिल्लीत कडाक्याची थंडी आहे. राहुल गांधींचा अशाच कडाक्याच्या थंडीतला एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. राहुल गांधींना थंडी वाजत नाही का? असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

सोमवारी राहुल गांधींनी महात्मा गांधी आणि भारताच्या माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली अर्पण केली. दिल्लीतल्या हाडं गोठवणा-या थंडीत राहुल गांधी केवळ टीशर्टमध्ये दिसले. ना शाल ना स्वेटर.. राहुल गांधींनी फक्त टीशर्ट आणि पँट असा पेहराव केला होता. 

इतक्या बोच-या थंडीत राहुलनी स्वेटर, जॅकेट किंवा शाल का पांघरली नाही असा सवाल सोशल मीडियावर विचारला जात आहे. एखादा तपस्वीच इतक्या थंडीत स्वेटर, जॅकेट, शालशिवाय फिरु शकतात अशी स्तुतीसुमनं काँग्रेस नेत्यांनी उधळलेली असतानाच आता हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी देशाच्या काना कोपऱ्यात फिरत आहेत. अनेक किलोमीटर पर्यंत राहुल गांधी पायी चावत फिरत आहेत. राहुल गांधी भारत जोडो यात्रे दरम्यान आपल्या सहकाऱ्यांसबोत टेंटमध्ये राहत आहेत. यात्रेदरम्यान राहुल गांधी नियमित वर्कआऊट करतात. 

पूरे विश्व को प्रेम और अहिंसा की सीख दी है भारत की पवित्र भूमि ने। इन्ही आदर्शों को दिल में लिए, भारत मां के सपूतों के पदचिह्न देख, आगे बढ़ रहे हैं हम… pic.twitter.com/fqjBp3mNP1

— Imran Malik (@ImranMalik095) December 26, 2022

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *