Rafale Deal : नागपूरमध्ये निर्मित सुट्या भागांवर राफेलची जगभरात भरारी! आत चीनच्या मनात बसली धडकी..

rafale-deal-:-नागपूरमध्ये-निर्मित-सुट्या-भागांवर-राफेलची-जगभरात-भरारी!-आत-चीनच्या-मनात-बसली-धडकी.

Rafale Deal : नागपूरमध्ये राफेट जेटसाठीच्या पाच सुट्या भागांची निर्मिती होते.

Rafale Deal : नागपूरमध्ये निर्मित सुट्या भागांवर राफेलची जगभरात भरारी! आत चीनच्या मनात बसली धडकी..

जेटची भरारी

Image Credit source: सोशल मीडिया

नागपूर : महाराष्ट्राची दुसरी राजधानी असलेल्या नागपूरमध्ये (Nagpur) निर्मित सुट्या भागांवर शत्रूच्या मनात धडकी भरवणारे राफेल भरारी घेत आहे. पाच महत्वाच्या सुट्या भागांची निर्मिती नागपूर मिहान प्रकल्पात (Mihan Project) करण्यात येते. दसॉल्ट-रिलायन्स प्रकल्प मिहानमध्ये असून तिथे या सुट्या भागाची निर्मिती करण्यात येते. हे भाग नंतर राफेल जेट (Rafale Jet) विमानाला जोडण्यासाठी फ्रान्समध्ये पाठविण्यात येतात. याविषयीची माहिती मुंबईत आलेल्या फ्रान्सच्या महावाणिज्यदूतांनी दिली आहे.

फ्रान्सचे महावाणिज्यदूत जीन मार्क सेरे-शार्लेट यांनी मिहानमधील दसॉल्ट रिलायन्स एअरोस्पेस लिमिटेड तसेच एअर लिक्विडला भेट दिली. याप्रकल्पात राफेल आणि फाल्कन-2000 ची निर्मिती करण्यात येते. व्यापारासह, संरक्षण, ऊर्जा, शिक्षण आणि गुंतवणूक क्षेत्रात भारत आणि फ्रान्समध्ये दृढ संबंध निर्मितीवर भर देण्यात येत आहे.

भारतासाठी हा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी एजेंस फ्रान्किस डेव्हलपमेंट पब्लिक डेव्हलपमेंट बँकेने 130 कोटी युरोचे आर्थिक सहाय केले आहे. पुढील 20 वर्षांसाठी हे कर्ज देण्यात आले आहे. त्याआधारे या प्रकल्पात लढाऊ विमानांसाठीचे सुट्टे भाग तयार करण्यात येत आहे.

या फायटर जेटच्या ट्विन इंजिनला संरक्षण देणारे दरवाजे नागपूर येथील प्रकल्पात तयार करण्यात आले आहेत. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्स आणि फ्रेंच फर्म दसॉल्ट एविशनमध्ये या प्रकल्पातंर्गत सुट्टे भाग तयार करण्यात येत आहेत.

भारत सरकारने फ्रान्ससोबत 58 हजार कोटी रुपयांचा सौदा केला आहे. त्यातून भारताला 36 लढाऊ विमाने देण्यात येणार आहेत.तीन वर्षांपूर्वी फ्रान्सने पहिले राफेल दिले होते. त्यानंतर आता चीनच्या वाढत्या कुरापतीच्या पार्श्वभूमीवर शेवटचे विमानही भारतात दाखल झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *