Prashant Kishor: “मला पश्चाताप होतोय…”, नितीश कुमारांवर बोलताना प्रशांत किशोर चांगलेच भडकले!

Prashant Kishor News: चर्चेत असलेल्या प्रकरणावर बोलताना नितीश कुमार यांची जीभ घसरली. ‘जो पियेगा वो मरेगा’ असं म्हण नितीश कुमार यांनी प्रकरणावर (Bihar News) फुल्ल स्टॉप देण्याचा प्रयत्न केला.
Updated: Dec 17, 2022, 12:24 AM IST
Prashant Kishor,Nitish kumar
Prashant Kishor On Nitish kumar: विषारी दारु पिल्यानं (Drinking poisonous liquor) बिहारमध्ये 65 जणांचा मृत्यू झाल्याची (65 people died in Bihar) घटना बिहारमध्ये घडली होती. त्यानंतर देशभर बातमी वाऱ्यासारखी पसरली. छपरामध्ये घडलेल्या या घटनेवर शोक व्यक्त होत असताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar CM Nitish Kumar) यांच्या वक्तव्यामुळे मोठा राडा होत असल्याचं पहायला मिळतंय.
चर्चेत असलेल्या प्रकरणावर बोलताना नितीश कुमार यांची जीभ घसरली. ‘जो पियेगा वो मरेगा’ असं म्हण नितीश कुमार यांनी प्रकरणावर फुल्ल स्टॉप देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या वक्तव्यानंतर मोठा वाद उभा राहिला आहे. अशातच प्रसिद्ध राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी नितीश कुमार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
काय म्हणाले प्रशांत किशोर ?
नितीश कुमार (Nitish kumar) यांच्याएवढा संवेदनाहीन माणूस मी पाहिला नाही, मला पश्चाताप होतोय की मी 2014-15 मध्ये त्यांची मदत केली, अशा शब्दात प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी नितीश कुमार यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. या अहंकारी व्यक्तीचा सर्वनाश निश्चित आहे, असं म्हणत प्रशांत किशोर यांनी हल्लाबोल केला आहे.
आणखी वाचा – Hostel girls: शाळकरी मुलींनी शिकवला हेडमास्तरला ‘धडा’, चपलेनं धू-धू धुतलं; नंतर जे काही झालं…पाहा Video
दरम्यान, मुख्यमंत्री आरजेडीसोबत (RJD) कधीच आरामात राहू शकत नाहीत. मुख्यमंत्रीपदावर राहणं ही त्यांची मजबुरी असल्याचं देखील प्रशांत किशोर यांनी म्हणलंय. बिहारमध्ये घरोघरी होम डिलिव्हरी केली जाते. राज्याला त्यामुळे दरवर्षी 20 हजार कोटी रुपयांचं नुकसान होतं. त्यामुळे बिहारची दारूबंदी (Bihar liquor ban) पुर्णपणे फसली आहे, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.