PM नरेंद्र मोदी यांना मातृशोक : हिराबेन मोदी यांचं निधन

(Prime Minister Narendra Modi’s mother Heeraben Modi passed away at the age of 100)
अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं आज (शुक्रवारी) पहाटे साडे तीनच्या दरम्यान अहमदाबादमध्ये निधन झालं. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हिराबेन यांना बुधवारी २८ डिसेंबरला अहमदाबादमधील यूएन मेहता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तेव्हा त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली होती.
मैं जब उनसे 100वें जन्मदिन पर मिला तो उन्होंने एक बात कही थी, जो हमेशा याद रहती है कि કામ કરો બુદ્ધિથી, જીવન જીવો શુદ્ધિથી यानि काम करो बुद्धि से और जीवन जियो शुद्धि से।
— Narendra Modi (@narendramodi) December 30, 2022
मोदी आपल्या आईला हिराबा म्हणून हाक मारत. कुटूंब चालवण्यासाठी हिराबाने दुसऱ्यांच्या घरी भांडी घासली कष्ट केलेत अशी माहिती पंतप्रधानांनी एका मुलाखतीत दिली होती. याच वर्षी १८ जूनला हिराबेन यांनी आपला १०० वा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी नरेंद्र मोदींनी एक ब्लॉग लिहिला होता. ज्यात त्यांनी हिराबा १०० व्या वर्षात पदार्पण करत असल्याचं जाहीर केलं होतं.
“माझ्या जीवनात, माझ्या व्यक्तिमत्त्वात जे काही चांगलं आहे ते माझ्या आई वडिलांमुळेच आहे” अशा शब्दात त्यांनी आईबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या. हिराबांनी अंगावर कधी सोन्याचे दागिने घातले नाही आणि त्यांच्या नावावर कोणतीही संपत्ती नाही असा उल्लेख पंतप्रधानांनी या ब्लॉगमध्ये केला आहे.
हिराबांच्या १०० व्या वाढदिवासानिमित्त भेटण्यासाठी पंतप्रधान गांधीनगरच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यांनी आईचे पाय धुऊन आशीर्वाद घेतले होते. दरवर्षी वाढदिवसाला हिराबांची भेट घेऊन मोदी आशीर्वाद घ्यायचे. वाढदिवसाला हिराबा त्यांना कायम भेट म्हणून काही पैसे द्यायच्या. मोदींच्या ६४ व्या वाढदिवशी हिराबांनी त्यांना ५००० रुपये गिफ्ट म्हणून दिले होते. पंतप्रधान रिलिफ फंडात ते पैसे जमा करण्यात आले होते. गुजरात निवडणुकीवेळी मतदान करायला गेले असताना मोदींनी हिराबेन यांचे आशिर्वाद घेतले होते.