Photoshoot करताना मध्येच माकड आलं, जोडप्याची चांगलीच तारांबळ उडाली! हसून वेडे व्हाल

photoshoot-करताना-मध्येच-माकड-आलं,-जोडप्याची-चांगलीच-तारांबळ-उडाली!-हसून-वेडे-व्हाल

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक कपल वेडिंग फोटोशूट करत होते.

Photoshoot करताना मध्येच माकड आलं, जोडप्याची चांगलीच तारांबळ उडाली! हसून वेडे व्हाल

pre wedding photoshoot

Image Credit source: Social Media

हल्ली लग्नाआधी फोटोशूटचा ट्रेंड खूप वाढला आहे. त्यामुळे या कपलचे चांगले फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर्सही त्यांना वेगवेगळ्या लोकेशन्सवर नेऊन त्यांचं फोटोशूट करतात. पण जंगली भागात कधी कधी प्राणीही त्यांच्या त्रासाचं कारण बनतात. असाच काहीसा प्रकार एका जोडप्याच्या लग्नाच्या फोटोशूटदरम्यान घडला, तेव्हा अचानक एक माकडीण तिथे आली आणि ती नवरदेवाच्या कुशीतच जाऊन बसली. हे बघून सगळेच अगदी खळखळून हसतायत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक कपल वेडिंग फोटोशूट करत होते, त्यावेळी एक माकडीण आपल्या मुलासोबत येते. ही माकडीण सगळ्यात आधी वधूच्या दिशेने जाते. ज्यामुळे ती स्त्री घाबरून जाते आणि दूर जाते.

यानंतर माकडीण नवरदेवाचा हात धरून थेट त्याच्या कडेवर जाऊन बसते. या दरम्यान माकडीण मोठ्या प्रेमानं नवरदेवाला मिठी मारते.

विशेष म्हणजे नवरदेवही त्या माकडीणीला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत नाही आणि हसत राहतो. व्हिडिओ पाहून तुम्हाला असं वाटेल की, माकडीण नवरदेवाला म्हणतेय – “चल, हा माझा नवरा आहे.” विशेष म्हणजे या माकडिणीच्या पाठीवर तिचं छोटंसं पिल्लू सुद्धा आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर she_saidyes नावाच्या अकाऊंटसह शेअर करण्यात आला आहे. युझरने कॅप्शनमध्ये लिहिले की, “विश्वास बसत नाही की, आमच्या व्हिडिओग्राफर्सना हे चित्रीकरण करायला मिळाले. काय जंगली दिवस आहे. पण मला हा क्षण खूप गोड वाटला. माकड आणि त्याचं बाळही गोंडस दिसत होतं.” बातमी लिहिताना या व्हिडिओला साडेतीन लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे, तर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.

युझर्स मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिले, “माकडीण नवरा शोधत होती आणि तिला तुझा नवरा आवडला.”

त्याचवेळी आणखी एका युझरने कमेंट केली की, “ती आपल्या पतीला आपलं मूल दाखवण्यासाठी आली होती.” आणखी एका युझरने लिहिले की, जणू काही माकडीण महिलेला सांगत आहे, आपण फोटो काढूया…आता ह्याला जवळ ओढायची पाळी माझी आहे.” एकूणच हा व्हिडीओ बघून लोकांना खूप हसू आलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *