pathaan-:-शाहरुख-खान

News

  • मुख्यपृष्ठ
  • करमणूक &nbsp/ बॉलीवूड – bollywood news
  • Pathaan : शाहरुख खान ‘पठाण’ची रिलीज डेट बदलणार? प्रसिद्ध अभिनेत्याचा खुलासा

KRK On Pathaan : अभिनेका केआरकेने ट्वीट करत शाहरुखच्या ‘पठाण’ सिनेमासंदर्भात भाष्य केलं आहे.

Pathaan Shahrukh Khan will change the release date of Pathaan Disclosure of famous actor Pathaan : शाहरुख खान 'पठाण'ची रिलीज डेट बदलणार? प्रसिद्ध अभिनेत्याचा खुलासा

Pathaan

KRK On Pathaan Release Date : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या त्याच्या आगामी ‘पठाण’ (Pathaan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. रिलीजआधीच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आता किंग खान या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

लोकप्रिय अभिनेता आणि चित्रपट समीक्षक केआरके (KRK) म्हणजेच कमाल रशीद खानने शाहरुखच्या ‘पठाण’ सिनेमासंदर्भात भाष्य केलं आहे. त्याने ट्वीट केलं आहे,”पठाण’ या सिनेमाचं नाव बदलण्यात येणार आहे. तसेच भगव्या रंगाची बिकीनीदेखील बदलली जाणार आहे. तसेच निर्मात्यांनी या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा केली जाईल”. 

It’s confirm that #Pathaan title is no more. Orange bikini is also no more. But now makers have decided to postpone the release of the film. Official announcement can come today or tomorrow.

— KRK (@kamaalrkhan) January 3, 2023

live reels News Reels

केआरकेचं ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अद्याप निर्मात्यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केलेली नाही. केआरकेच्या ट्वीटने शाहरुखचे चाहते मात्र हैराण झाले आहेत. केआरकेचं ट्वीट नेटकऱ्यांसाठी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 

‘पठाण’ कधी रिलीज होणार? 

‘पठाण’ या सिनेमात शाहरुख खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा 25 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच या बहुचर्चित सिनेमात भाईजान सलमान खानची (Salman Khan) झलकदेखील पाहायला मिळणार आहे. 

शाहरुखचे आगामी सिनेमे (Shah Rukh Khan Upcoming Movies) : 

शाहरुख खानचा ‘पठाण’ हा सिनेमा 25 जानेवारी 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमासह त्याचे अनेक सिनेमे पाईपलाईनमध्ये आहेत. त्याच्या आगामी सिनेमाच्या यादीत ‘डंकी’ (Dunki) सिनेमाचा समावेश आहे. या सिनेमात त्याच्यासोबत तापसी पन्नू (Taapsee Pannu) स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. राजकुमार हिरानी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. तसेच शाहरुखचा ‘जवान’ हा सिनेमादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

संबंधित बातम्या

Shah Rukh Khan : बॉडी बनवायला किती वेळ लागला? चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुखने दिलं मजेशीर उत्तर

Published at : 03 Jan 2023 07:06 PM (IST) Tags: entertainment shahrukh khan KRK Pathaan BOLLYWOOD

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *