PAK vs NZ: अरे कोंबडी पकड कोंबडी! टॉमच्या कॅचला अबरार-इमामचा 'मधला टप्पा'; बाबरचा वाढला पारा

pak-vs-nz:-अरे-कोंबडी-पकड-कोंबडी!-टॉमच्या-कॅचला-अबरार-इमामचा-'मधला-टप्पा';-बाबरचा-वाढला-पारा

Babar Azam Got Angry: क्षेत्ररक्षक छोट्या-छोट्या चुकांमुळे पाकिस्तानची जगभर नाचक्की होताना दिसते. अशातच आता सध्या सुरू असलेल्या पाकिस्तान आणि न्यूझीलंड (Pakistan vs New Zealand) सामन्यात आणखी एक नमुना पहायला मिळाला.

Updated: Dec 28, 2022, 11:30 PM IST

pak vs nz babar azam got angry

Pakistan vs New Zealand, 1st Test : पाकिस्तान आणि न्यूझीलंड (PAK vs NZ) यांच्यात सुरू असलेला पहिल्या कसोटी सामना (1st Test) रोमांचक स्थितीत पोहोचला आहे. पहिल्या कसोटीत अनेक रंजक दृश्यं समोर येत आहेत. पाकिस्तानचा संघ आधीच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) शर्यतीतून बाहेर पडला आहे. त्याला कारण ठरली पाकिस्तानची सुमार फिल्डिंग (Fielding)… चांगली बॉलिंग करून आणि चांगली बॅटिंग करून देखील पाकिस्तानला पराभवाचं तोंड पहावं लागतं. (pak vs nz 1st test abrar ahmed imam ul haq dropped tom blundell catch babar azam got angry badly watch video)

क्षेत्ररक्षक छोट्या-छोट्या चुकांमुळे पाकिस्तानची जगभर नाचक्की होताना दिसते. अशातच आता सध्या सुरू असलेल्या पाकिस्तान आणि न्यूझीलंड (Pakistan vs New Zealand) सामन्यात आणखी एक नमुना पहायला मिळाला. पाकिस्तानने दिलेल्या 438 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने 440 धावा केल्या आहेत. आजच्या सामन्यात देखील पाकिस्तानची खराब फिल्डिंग (Poor fielding by Pakistan) पहायला मिळाली आहे.

आणखी वाचा – IND vs SL: ‘किसीने मुफ्त में पा लिया वो शख्स…’, टीम इंडियातून डावलल्याने Prithvi shaw ची इमोशनल पोस्ट!

न्यूझीलंडचे टॉम बंडल (Tom Bundle ) आणि केन विल्यमसन (Kane Williamson) क्रीजवर होते. विल्यमसन 85 वर तर बंडल 39 धावांवर खेळत होता. दरम्यान नौमान अली 118 वं ओव्हर टाकण्यासाठी आला. नौमनने ओव्हरमधील तिसरा चेंडू टाकल्यानंतर टॉमने तो चेंडू मिड ऑफ आणि कव्हरच्या दिशने उचलला. टॉमने खेळलेला चिक शॉट पाहून पाकिस्तानचे अबरार अहमद आणि इमाम-उल-हक हे दोन फिल्डर बॉलच्या मागे धावले. मात्र गोंधळामुळे एकाही क्षेत्ररक्षकाला तो पकडता आला नाही.

पाहा Video – 

Just a normal day in Pakistan cricket..! #PAKvNZ pic.twitter.com/Gis0TpLi3u

— Don’t judge..! (@imrathoreshpnit) December 28, 2022

दरम्यान, अबरार अहमद (abrar ahmed)) आणि इमाम-उल-हक (imam ul haq) या दोघांना कॅच पकता आला नाही. तू पकड तू पकडच्या नादात कॅच सुटला. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर पाकिस्तानचं हसू होताना दिसतंय. हा प्रकार पाहून कॅप्टन बाबर आझमचा पारा चांगलाच चढला. बाबरची रिअॅक्शन पाहण्याजोगी होती. त्यामुळे आता सध्या हाच व्हिडिओ होताना दिसतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *