Pak Vs Eng : पाकिस्तानचा रडीचा डाव! इंग्लंडविरूद्ध पराभव टाळण्यासाठी काय काय केलं

pak-vs-eng-:-पाकिस्तानचा-रडीचा-डाव!-इंग्लंडविरूद्ध-पराभव-टाळण्यासाठी-काय-काय-केलं

Pak Vs Eng :  रावळपिंडी येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा (pakistan vs england) 74 धावांनी पराभव केला. इंग्लंडने (england) तब्बल 22 वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये (pakistan) कसोटी सामना जिंकलाय.त्यामुळे इंग्लंडसाठी हा ऐतिहासिक विजय होता. मात्र इंग्लंडसाठी हा विजय तितकासा सोपा नव्हता. कारण पाकिस्तानने इंग्लंडच्या हातून सामना निसटावा यासाठी अनेक प्रयत्न केले होते. मग ते वॉशरूममध्ये वेळ घावलणे असो अथवा मैदानावर ग्लोव्हज बदलणे असो. मात्र पाकिस्तानच्या पराभव टाळण्यासाठीच्या सर्व योजना इंग्लंडने हाणून पाडल्या आणि ऐतिहासिक विजय मिळवला. 

हे ही वाचा : बांगलादेशी क्रिकेटपटूंच्या पत्नी सौंदर्यात अभिनेत्रींनाही टाकतात मागे, पाहा PHOTO

पाकिस्तानसमोर 343 धावांचे लक्ष्य

कसोटी सामना जिंकण्यासाठी इंग्लंडने पाकिस्तानला (pakistan vs england) 343 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र अखेरच्या डावात पाकिस्तानला 268 धावाच करता आल्या. आणि त्यांचा 74 धावांनी पराभव झाला. मात्र हा विजय इंग्लंडसाठी तितकासा सोपा नव्हता. 

रावळपिंडी कसोटीच्या (rawalpindi test) पाचव्या आणि शेवटच्या दिवशी असा प्रसंग आला की, या सामन्यात एकवेळ असे वाटते होते की, इंग्लंड खूप मागे पडले होते आणि पाकिस्तान जबरदस्त विजय नोंदवेल. प्रथम मोहम्मद रिझवान आणि शौद शकील यांच्यात भागीदारी झाली, त्यानंतर अझहर अली-आगा सलमान यांनी मिळून 61 धावा जोडल्या. येथे पाकिस्तान सहज विजय मिळवेल किंवा सामना ड्रॉ करण्याच्या दिशेने वाटचाल करत होता. 

हे ही वाचा : वर्ल्डकप संपताच एकाच रात्री गायब होणारा हा स्टेडिअम, जाणून घ्या कसं ते 

येथे फिरला सामना

259 धावांवर पाकिस्तानची सहावी विकेट पडताच खेळाला कलाटणी मिळाली. आणि इंग्लंडने पाकिस्तानचे (pakistan vs england) झटपट विकेट घेतले.पाकिस्तानने त्यांचे शेवटचे 5 विकेट केवळ 9 धावांत गमावले आणि एक प्रकारे त्यांनी जिंकलेला सामना गमावला.

शेवटच्या तासात घडल्या नाट्यमय घडामोडी

रावळपिंडी कसोटीचा (rawalpindi test) शेवटचा तास नाट्यमय होता. कारण पाकिस्तानने पराभव टाळण्यासाठी प्रत्येक युक्ती आजमावली. शेवटच्या सत्रात ड्रिंक्स ब्रेक झाला तेव्हा पाकिस्तानच्या फलंदाजांनी निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ घेतला. मोहम्मद अली वॉशरूममुळे उशिरा मैदानावर परतला. यानंतर नसीम शाह शेवटच्या ओव्हरमध्ये ग्लोव्हज बदलताना दिसला. या दोन्ही वेळी पाकिस्तानने वेळकाढूपणा करत सामना ड्रॉ च्या दिशने ढकलण्याचा प्रयत्न केला. 

बॅड लाईटवर इंग्लंडचा तोडगा 

सामना अंतिम टप्प्यात जेव्हा इंग्लंडच्या पारड्यात होता, तेव्हा सूर्य मावळत होता. त्यामुळे पंचांनी लाईट मीटरही बाहेर काढले होते. पाकिस्तानी फलंदाजांच्या वतीनेही बॅड लाईटबद्दल बोलले जात होते, पण पाकिस्तानी फलंदाजांनी बॅड लाईटबद्दल तक्रार करू नये म्हणून इंग्लंडने येथे एका टोकाला फिरकी गोलंदाज ठेवले. आणि पाकिस्तानचे सर्व प्रयत्न हाणून पाडत इंग्लंडने बाजी मारली.

दरम्यान इंग्लंडने तब्बल 22 वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये (pakistan vs england) कसोटी सामना जिंकला होता. याआधी साल 2000 साली इंग्लंडने 6 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळे इंग्लंडसाठी हा ऐतिहासिक विजय होता. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *