Out नसतानाही सोडावं लागलं मैदान; द्विशतकाचं सेलिब्रेशन David Warner ला पडलं महागात! पाहा Video

out-नसतानाही-सोडावं-लागलं-मैदान;-द्विशतकाचं-सेलिब्रेशन-david-warner-ला-पडलं-महागात!-पाहा-video

ऑस्ट्रेलिया फलंदाजी उतरली असता, ओपनर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने (David Warner) द्विशतक ठोकलं. 200 रन्स पूर्ण झाल्यावर त्याने इतक्या जोशात सेलिब्रेशन केलं की त्याला रिटायर्ड हर्ट व्हावं लागलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. 

Updated: Dec 27, 2022, 04:59 PM IST

David Warner double century: ऑस्ट्रेलिया विरूद्ध दक्षिण (AUS vs SA 2nd Test) आफ्रिका यांच्यामध्ये 3 सामन्यांची टेस्ट सिरीज (test series) सुरु आहे. 26 डिसेंबरपासून मलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये दुसरी टेस्ट मॅच खेळवण्यात येतेय. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या टीमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी दक्षिण आफ्रिकेची टीम अवघ्या 189 रन्सवर ऑलआऊट झाली. ज्यानंतर ऑस्ट्रेलिया फलंदाजी उतरली असता, ओपनर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने (David Warner) द्विशतक ठोकलं. 200 रन्स पूर्ण झाल्यावर त्याने इतक्या जोशात सेलिब्रेशन केलं की त्याला रिटायर्ड हर्ट व्हावं लागलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. 

David Warner ने ठोकलं द्विशतक

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (Australia vs South Africa) यांच्यात सुरु असलेल्या कसोटी सामन्यात डेव्हिड वॉर्नरने शतक ठोकले आहे. वॉर्नरने (David Warner Double Century)  त्याच्या 100 व्या कसोटीत शतक ठोकले आहे. अशी कामगिरी करणारा तो 10वा फलंदाज ठरला आहे. त्याने खेळताना 254 बॉलमध्ये 200 धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरनेही आपल्या खेळीत 16 चौकार आणि 2 षटकार मारले.

सेलिब्रेशन करताना स्वतःला करून घेतली दुखापत

36 वर्षीय डेव्हिड वॉर्नरने त्याचं शतक पूर्ण करताच अगदी जोशात सेलिब्रेशन केलं. यावेळी तो गुडघ्यावर बसून आनंद व्यक्त केला. त्यानंतर त्याने नेहमीप्रमाणे उंच उडी घेत सेलिब्रेट केलं. मात्र यावेळी त्याच्या पायामध्ये क्रॅम्प आला. ज्यामुळे तो दुखापतग्रस्त झाला. यावेळी मैदानावर ऑस्ट्रेलिया टीमने फिजीओ देखील आले आणि त्याच्यावर उपचार केले. मात्र रिकव्हरी साठी त्याला मैदानाबाहेर जावंच लागलं. त्यामुळे 200 रन बनवून तो रिटायर्ड हर्ट झाला.

A double century for David Warner!

But his #OhWhatAFeeling jump comes at a cost! #AUSvSA | @Toyota_Aus pic.twitter.com/RqJLcQpWHa

— cricket.com.au (@cricketcomau) December 27, 2022

शतकाचा दुष्काळ संपवला 

डेव्हिड वॉर्नरने (David Warner Double Century) यापूर्वी जानेवारी 2021 मध्ये आपले शेवटचे कसोटी शतक झळकावले होते. त्यानंतर आता 2022 मध्ये त्याने 200 धावांची स्फोटक खेळी खेळून आपल्या 3 वर्षांच्या शतकांचा दुष्काळ संपवला आहे. तो बऱ्याच दिवसांपासून खराब फॉर्मशी झुंजत होता आणि त्याला संघातून वगळल्याची चर्चा होती. मात्र आता त्याने डबल सेंच्यूरी ठोकून सर्वांची तोंड बंद केली आहेत. 

8 हजार धावा पूर्ण 

डेव्हिड वॉर्नरने (David Warner Double Century) मेलबर्नच्या कठीण खेळपट्टीवर खुप चांगली फलंदाजी केली आहे. वॉर्नरने कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या 8000 धावाही पूर्ण केल्या आहेत. आपल्या 100व्या कसोटीत द्विशतक झळकावणारा तो पहिला ऑस्ट्रेलियन फलंदाज आहे. त्याच वेळी, जगात आणखी एक फलंदाज आहे, ज्याच्या आधी रूटने ही कामगिरी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *