New Year 2023 : जाणून घ्या सर्वोत्कृष्ट 10 सिनेमे…

- मुख्यपृष्ठ
- करमणूक  / बॉलीवूड – bollywood news
- New Year 2023 : ‘पठाण’ ते ‘आदिपुरुष’; नववर्षात प्रदर्शित होणाऱ्या सर्वोत्कृष्ट सिनेमांबद्दल जाणून घ्या…
Bollywood Movies : जाणून घ्या नववर्षात प्रदर्शित होणारे सर्वोत्कृष्ट 10 सिनेमे…
Bollywood Movies
Bollywood Movies : नवीन वर्षात अनेक बिग बजेट सिनेमे (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. जाणून घ्या नववर्षात प्रदर्शित होणारे सर्वोत्कृष्ट 10 सिनेमे…
1. कुत्ते (Kuttey) : विशाल भारद्वाजचा लेक म्हणजेच आसमान भारद्वाजचा आगामी ‘कुत्ते’ हा सिनेमा नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा 13 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अर्जुन कपूर, तब्बू, नसीरुद्दीन शाह, कोंकणा सेन शर्मा मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
2. पठाण (Pathaan) : शाहरुख खानचा बहुचर्चित ‘पठाण’ हा सिनेमा 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं आहे. शाहरुखसह या सिनेमात दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
3. मैदान (Maidaan) : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा आगामी ‘मैदान’ हा सिनेमा 17 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा सैय्यद अब्दुल रहीम यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. अमित शर्माने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
News Reels
4. किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) : सलमान खानचा आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ हा सिनेमा 21 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात प्रेक्षकांना थरार, नाट्यासह अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे.
5. रॉकी और रानी की प्रेम कहानी (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) : करण जौहरचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा सिनेमा 28 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. धर्मा प्रोडक्शनच्या या सिनेमात धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आजमी, रणवीर सिंह आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत.
6. जवान (Jawan) : शाहरुख खानचा बहुचर्चित ‘जवान’ हा सिनेमा 2 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात शाहरुख खान, नयनतारा आणि विजय सेतुपथी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. एटली कुमारने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
7. आदिपुरुष (Adipurush) : ‘आदिपुरुष’ हा बहुचर्चित सिनेमा या वर्षातला सर्वात मोठा बिग बजेट सिनेमा आहे. 16 जूनला हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. रामायणावर आधारित या सिनेमात सुपरस्टार प्रभास, सैफ अली खान, कृती सेनन आणि सनी सिंह मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. मराठमोळ्या ओम राऊतने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
8. सत्यप्रेम की कथा (Satyaprem Ki katha) : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणीचा ‘सत्यप्रेम की कथा’ हा सिनेमा 29 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. समीर विद्वांसने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
9. टायगर 3 (Tiger 3) : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा आगामी ‘टायगर 3’ चा सिनेमा येत्या वर्षात 10 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साजिद खानने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात सलमान खानसह कतरिना कैफ स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.
10. डंकी (Dunki) : राजकुमार हिरानीचा ‘डंकी’ हा सिनेमा 22 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात शाहरुख खान आणि तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहेत.
संबंधित बातम्या
Animal First Look : रणबीर कपूरच्या ‘Animal’ सिनेमाची रिलीज डेट जाहीर; पोस्टर आऊट