Nashik News : महावितरणची कमाल, घरात दोन एलईडी बल्ब, महिन्यात बील आलं तेवीस हजार

- मुख्यपृष्ठ
- बातम्या  / नाशिक
- Nashik News : महावितरणची कमाल, घरात दोन एलईडी बल्ब, महिन्यात बील आलं तेवीस हजार
Nashik News : नाशिक त्र्यंबकेश्वर तालुक्यात एका वीज बिल ग्राहकाला अव्वाच्या सव्वा बिल आहे आहे.
By: गोकुळ पवार | Updated at : 18 Dec 2022 03:55 PM (IST)
Mahavitaran Light Bill
Nashik News : गेल्या अनेक वर्षांपासून वीज पुरवठा (Power Supply) करत असलेले महावितरण (Mahavaitran) आता स्मार्ट झालंय. म्हणजेच ऑनलाईन बिल भरणे, ऑनलाईन रिडींग करणे त्याचबरोबर काही तक्रार असल्यास ती देखील ऑनलाईन करण्याची सेवा महावितरणने केली आहे. मात्र अशातच ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिल येण्याचे प्रकार हल्ली मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
नाशिकच्या (Nashik) ग्रामीण भागातील त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer)e तालुक्यात अशाच प्रकार घडला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील झारवड खुर्द येथील ग्राहकाला चक्क एका महिन्यात तब्बल तेवीस हजार नऊशे साठ रुपये वीज बिल आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील झारवड गावात राहणाऱ्या ग्राहक निवृत्ती रोकडे याच्या संदर्भात घटना घडली आहे. रोकडे यांच्या घरात अवघे दोन बल्ब असताना त्यांना महिन्याचे तब्बल 23 हजार रुपये आल्याने त्याला धक्का बसला आहे. मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
दरम्यान त्र्यंबक तालुक्यातील झारवड खुर्द दीडशे ते दोनशे आदिवासी लोकवस्ती असलेले गाव आहे. येथील निवृत्ती रोकडे यांचा वीज वापर फक्त दोन एलईडी बल्ब असून नऊ आणि बारा वॅटचे आहेत. त्या व्यतिरिक्त कुठलाही विजेचा वापर नसल्याचे ग्राहक निवृत्ती रोकडे यांनी सांगितले. मागील डिसेंबर महिन्यात 23 हजार 540 रुपये इतके अवाढव्य वीज बिल रोकडे यांना आले होते. हे बिल 03 डिसेंबर रोजी भरल्यास त्यांना 23 हजार 840 रुपये मोजावे लागणार होते. मात्र, रोकडे यांनी याबाबत अर्जाद्वारे त्र्यंबकेश्वर वीज वितरण कार्यालयात लेखी तक्रार नोंदवून अतिरिक्त बिलाबाबत माहिती कळविली होती. त्र्यंबकेश्वर वीज वितरण कार्यालयाकडून चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, एक महिना उलटूनही कोणतीही कार्यवाही न केल्याने पुढील महिन्यात आलेले बिलात वजावट न होता बिल फुगवटा वाढून आले. ते तब्बल 23 हजार 960 रुपये इतके आल्याने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सर्वंच ग्राहकांच्या भुवया उंचावल्या असून महावितरण विभागाच्या गलथान कारभाराविषयी रोष निर्माण होऊन नाराजी व्यक्त केली जात आहे.
त्र्यंबकेश्वर महावितरण कार्यालयाकडून सदर मीटर फॉल्टी असल्याचा रिमार्क देण्यात आला असून पुढील चौकशीकरिता सातपूर कार्यालयाकडे सदर प्रकरण पाठविण्यात आल्याचे त्र्यंबकेश्वर कार्यक्षेतील लाईनमॅन आढाव यांनी सांगितले. तसेच सदर बिल 18 हजार 300 रुपयांनी वजावट करण्यात आली असून उर्वरीत 5240 वीज बिल ग्राहकाला भरावा लागणार आहे. मात्र, त्र्यंबकेश्वर कार्यालयाकडून यासंदर्भात देण्यात आलेली माहितीमध्ये तफावत असून आता आलेल्या बिलात कोणतीही वजावट दिसून येत नाही. आता आलेले वीज बिल चारशे रुपयांनी वाढून 23 हजार 940 इतके आले आहे. यासंदर्भात सातपूर कार्यालयाशी संपर्क साधला असता अशा संदर्भाची कोणतीही तक्रार माझ्यापर्यंत त्र्यंबकेश्वर कार्यालयाकडून आली नसल्याचे सातपूर महावितरण कार्यालयाचे निकुंभ यांनी सांगितले. दरम्यान महावितरण विभागाने जरी आधीचे बिल वजावट केल्याचे सांगत असले तरी अद्याप नवीन बिलात तशी वजावट दिसून येत नाही. जरी 18 हजार 300 रुपयांनी बिल कमी करून दिले असले तरी एक महिन्यात 5240 रुपये सर्वसामान्य ग्राहकाला भरणे डोईजड होणार आहे.
News Reels
ही वेबसाईट कुकीज आणि त्यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करते, यामुळे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने साईट अनुभवता येईल तसंच आपल्याला आपल्या आवडी-निवडींची काळजी घेतली जाते. आमच्या वेबसाईटचा वापर पुढे सुरु ठेवण्यासाठी तुम्ही आमच्या प्रायव्हसी पॉलिसीशी सहमत आहात