Nashik News : नाशिककर! वीज मीटरमध्ये फेरफार केला आहे का? महावितरण तुमच्या मागावर

- मुख्यपृष्ठ
- बातम्या  / नाशिक
- Nashik News : नाशिककर! वीज मीटरमध्ये फेरफार केला आहे का? महावितरण तुमच्या मागावर
Nashik News : नाशिक महावितरणने वीजचोरी रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
By: गोकुळ पवार | Updated at : 12 Dec 2022 11:55 AM (IST)
Nashik Light Meter
Nashik News : महाराष्ट्र राज्य वीज वितरण (Mahavitaran) कंपनीच्या नाशिक परिमंडळाने नाशिक (Nashik), नाशिक जिल्ह्यातील मालेगाव (Malegaon) आणि अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील तीन मंडळांमधील 222 ग्राहकांकडून 2 लाख 47 हजार 928 युनिट वीजचोरी उघडकीस आणली आहे. वीजचोरी रोखण्याच्या महावितरणच्या प्रयत्नांना यश आले आहे.
वीजचोरी (Power Theft) रोखण्यासाठी महावितरणच्या अधिकार्यांनी एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. ज्यासाठी वीज फीडर – वीज वाहिन्या आणि ट्रान्सफॉर्मर यांचा संच – ग्राहकांना वीज वितरित करण्यासाठी वापरल्या जाणार्या वीज फीडरवरील जास्तीत जास्त तोटा काढण्याचे धोरण राबविण्यात आले. यंदाच्या ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत ही मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत 222 ग्राहकांकडून जवळपास 2.5 लाख युनिटची चोरी झाल्याचे उघड झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात 169 ग्राहक 1.9 लाख युनिट वीज चोरी करताना आढळून आले, तर मालेगाव परिमंडळात 49 ग्राहक 57,133 युनिट वीज चोरी करताना पकडले गेले, तर नाशिक परिमंडळात चार ग्राहक 1,662 युनिट वीज चोरी करताना पकडले गेले.
महावितरणच्या प्रत्येक फीडरवर अनेक ग्राहक जोडलेले असतात. फीडरवरून दिली गेलेली वीज आणि संबंधित ग्राहकांच्या मीटरवर नोंद झालेला विजेचा वापर यांची पडताळणी करून वीजगळती निश्चित केली जाते. मुख्यतः वीजचोरीमुळे तूट वाढते. महावितरणने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक झोनमधील सर्वाधिक वीजगळती असलेले फीडर्स निश्चित केले. त्यानंतर त्यांच्याशी जोडलेल्या घरगुती आणि औद्योगिक ग्राहकांच्या वीजवापरावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित केले. यानुसार नाशिक परिमंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सर्वाधिक वीजचोरी अहमदनगर परिमंडळात झाली असून त्यापाठोपाठ मालेगाव आणि नाशिक परिमंडळात आहेत.
राज्यभरात 50 लाख युनिटची वीजचोरी
संबंधित ग्राहकांच्या मीटरमध्ये अचूक रिडिंग येत आहे का, मीटरमध्ये फेरफार केला आहे का, कोठे आकडा टाकून वीजचोरी होत आहे का याची माहिती महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी काढली व कारवाई केली. परिणामी त्या त्या भागातील वीजचोरीला आळा बसला असून राज्यभरात 5 दशलक्ष युनिटची वीजचोरी रोखली गेली आहे. महावितरणच्या घरगुती ग्राहकांपैकी बहुतांश ग्राहक हे शंभर युनिट वीज वापरणारे असून अशा पन्नास हजार ग्राहकांच्या एक महिन्याच्या वीजवापराएवढी ही वीज आहे. वीजचोरी रोखण्याच्या महावितरणच्या मोहिमेचा भाग म्हणून राज्याच्या प्रत्येक झोनमध्ये सर्वाधिक वीज गळती असलेले 230 फीडर निश्चित करून केलेली कारवाई यशस्वी झाली आहे. केवळ तीन महिन्यात 50 लाख युनिटची वीजचोरी उघडकीस झाली असून पुढील काळात देखील कारवाई करण्यात येणार आहे.
News Reels
ही वेबसाईट कुकीज आणि त्यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करते, यामुळे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने साईट अनुभवता येईल तसंच आपल्याला आपल्या आवडी-निवडींची काळजी घेतली जाते. आमच्या वेबसाईटचा वापर पुढे सुरु ठेवण्यासाठी तुम्ही आमच्या प्रायव्हसी पॉलिसीशी सहमत आहात