Nashik Crime : नाशिकचं विमा प्रकरण, मास्टरमाईंडला तर संपवलं, मात्र प्रकरणांत नवा ट्विस्ट

- मुख्यपृष्ठ
- बातम्या  / नाशिक
- Nashik Crime : नाशिकचं विमा प्रकरण, मास्टरमाईंडला तर संपवलं, मात्र प्रकरणांत आणखी नवा ट्विस्ट
Nashik Crime : नाशिकच्या विमा खून प्रकरणात आणखी एक धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे.
By: गोकुळ पवार | Updated at : 29 Dec 2022 10:53 AM (IST)
Nashik Crime Insurance
Nashik Crime : चार कोटी रुपयांचा विमा (Insurance) हडपण्यासाठी देवळाली कॅम्प (Deolali Camp) परिसरात राहणाऱ्या अशोक भालेराव यांचा 2 सप्टेंबर 2021 ला त्याच्याच 6 साथीदारांनी मारहाण तसेच अंगावर गाडी खालून खून करत अपघाताचा बनाव केला होता. विशेष म्हणजे त्याच्या नावावरील 4 कोटींच्या विम्याचे पैसेही काढून घेण्यात आल्याचं दोन आठवड्यापूर्वी समोर आलं होतं. दरम्यान या प्रकरणाच्या तपासात पोलीस खोलवर गेले असता आणखी एक धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे.
नाशिकमध्ये (Nashik) डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात विमा कंपनीचे चार कोटी रुपये लाटण्यासाठी एकाची हत्या करत अपघाताचा बनाव केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह पाच जणांना बेड्या ठोकल्या होत्या. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे ज्याची हत्या करत अपघाताचा बनाव रचण्यात आला तोच या प्रकरणाचा मास्टरमाईंड होता. मात्र, स्वतःच्या हत्येचा बनाव करणे त्याच्याच जीवावर बेतल्याचे समोर आले होते. दरम्यान या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला असून या संशयित आरोपींबी वर्षभरापूर्वी आणखी एका व्यक्तीच्या मृत्यूचा बनाव रचत विमा हडपण्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र हा प्लॅन फसल्याने त्यांनी त्यांच्याच टोळीतील एका संपवल्याचे काही दिवसांपूर्वी उघडकीस आले. दरम्यान या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी देवळाली परिसरात राहणाऱ्या अशोक भालेराव याचा चार कोटीच्या विम्यासाठी मित्रांनीच खून करत अपघाताचा बनाव रचला. विम्याचे चार कोटी रुपये हडपले. धक्कादायक बाबा म्हणजे अशोक भालेराव याचा खून करण्याच्या जवळपास 8 महिन्यांपूर्वी याच घटनेतील काही संशयित आरोपींनी 26 जानेवारी 2021 ला मध्यरात्री गोदावरी किनारी बसलेल्या एका अनोळखी ईसमाला दारू पाजली आणि त्याला एका स्कॉर्पिओ गाडीत बसवून आडगाव म्हसरुळ लिंक रोडवर फेकून देत त्याच्या अंगावरुन गाडी चालवून त्याला संपवत अपघात झाल्याचं दाखवलं होत, म्हसरूळ पोलीस ठाण्यात तेव्हा अपघाताचा गुन्हाही दाखल झाला होता. दरम्यान या प्रकरणी आता म्हसरूळ पोलीस ठाण्यात अशोकच्याच खुनाच्या घटनेतील आरोपींवर काल रात्री खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे या गुन्ह्यातील आरोपींमध्ये मयत अशोकचेही नाव आल्याने त्याचा नक्की या गुन्ह्यात काय संबंध होता? अनोळखी ईसमाचा दारू पाजून खून करण्यामागे नक्की उद्देश काय होता? अनोळखी ईसमाचा खून केल्यानंतर आठ महिन्यांनी अशोकचा खून का करण्यात आला? या आरोपींनी असे अजून किती खून करत अपघाताचे बनाव रचले आहेत ? मयत अनोळखी इसम नक्की कोण होता? या संपूर्ण गोष्टीचा पोलीस सध्या तपास करत आहेत.
News Reels
ही वेबसाईट कुकीज आणि त्यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करते, यामुळे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने साईट अनुभवता येईल तसंच आपल्याला आपल्या आवडी-निवडींची काळजी घेतली जाते. आमच्या वेबसाईटचा वापर पुढे सुरु ठेवण्यासाठी तुम्ही आमच्या प्रायव्हसी पॉलिसीशी सहमत आहात