MVA Morcha : मुंबईच्या रस्त्यावर भगवी लाट, मविआच्या महामोर्चाला तुफान गर्दी

mva-morcha-:-मुंबईच्या-रस्त्यावर-भगवी-लाट,-मविआच्या-महामोर्चाला-तुफान-गर्दी

मुंबई, 17 डिसेंबर : भाजप नेत्यांकडून महापुरूषांबद्दल करण्यात आलेली विधान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद यासह विविध मुद्द्यावरून महाविकास आघाडीने महामोर्चाचे आयोजन केले आहे आणि या मोर्चाला कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली आहे. भगवे, राष्ट्रवादी, काँग्रेसचे झेंडे घेऊन कार्यकर्ते हजर झाले आहे.

ठरल्याप्रमाणे सकाळी 11.30 वाजता हा मोर्चा मुंबईतील रिचर्डसन्स क्रुडास मिलपासून निघाला आहे. टाइम्स ऑफ इंडियापर्यंत हो मोर्चा पोहोचणार आहे. राज्यभरातून आणि मुंबईच्या कानाकोपऱ्यातून लाखो कार्यकर्ते या मोर्चात सामील झाले आहे.

या मोर्चा शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि घटकपक्ष, कम्युनिस्ट पक्ष सुद्धा सामील झाले आहे. लाखो कार्यकर्त्यांनी मुंबईचे रस्ते तुडुंब भरले आहे. संजय राऊत, सुप्रिया सुळे आंदोलनात सामील झाल्या आहेत.

थोड्याच वेळात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मोर्चात सहभागी होणार आहेत. मविआच्या या मोर्चाला मुंबई पोलिसांकडून 13 अटींवर परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीचा महामोर्चा आज मुंबईत काढण्यात येणार आहे. मात्र आजच्या मोर्चाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण गैरहजर राहणार आहेत. मात्र यावरुन आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. मात्र अशोक चव्हाणांनी या प्रकरणी भूमिका स्पष्ट केलीये. मोर्चाला माझा पूर्ण पाठिंबा आहे, मात्र एका निकटवर्तीय कुटुंबातील पूर्वनियोजित विवाहसोहळ्यामुळे मला मोर्चात सहभागी होणं शक्य नाही असं ट्विट करत त्यांनी भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, महापुरुषांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून हा मोर्चा काढून भाजप आणि सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचा असणार आहे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *