Mumbai : हे तर फारच भयंकर! 'बॉडी मसाज' शोधताना नको त्या साईटवर दिसले बायको अन् बहिणीचे फोटो
ऑनलाईन बॉडी मसाज शोधणाऱ्या मुंबईतल्या खार परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या पायाखालची जमीनच सरकली. घडलंही तसंच होतं, कॉल गर्ल्स एस्कॉर्ट साईटवर या व्यक्तीला स्वतःच्या पत्नीचा आणि बहिणीचा फोटो दिसला. या प्रकरणात आता एक महिलेला अटकही झालीये.
खार स्थित एक व्यक्ती इंटरनेटवर बॉडी मसाज शोधत होती. त्यावेळी या व्यक्तीला मसाज पार्लर आणि एस्कॉर्ट साईटवर स्वतःच्या पत्नीचा आणि बहिणीचा फोटो दिसला. हे बघून व्यक्तीला धक्काच बसला. या व्यक्तीने याची माहिती पत्नी आणि बहिणीला दिली. त्यावर त्या दोघींनी सांगितलं की, हे फोटो 3 ते 4 वर्षापूर्वीचे आहेत. या फोटो कुणीतरी परस्पर वापरले असावेत, असं त्यांनी सांगितलं.
पत्नी आणि बहिणीचे फोटो कुणी केले होते अपलोड?
संबंधित व्यक्तीने एस्कॉर्ट साईटवरील फोटोबरोबर दिलेल्या नंबर कॉल केला. कॉलवर एक महिला होती. तिने स्वतःचं नाव रेशमा यादव असं सांगितलं. त्यानंतर रेशमा यादवने त्या व्यक्तीला खार मध्ये एका हॉटेलजवळ असलेल्या ठिकाणी भेटायला बोलावलं.
पत्नी आणि बहिणीने विचारला जाब
कॉलवर बोलणं झाल्यानंतर तो व्यक्ती पत्नी आणि बहिणीला सोबत घेऊन त्या हॉटेलजवळ पोहोचला. त्यानंतर फोनवर बोललेली महिला (रेशमा यादव) त्या ठिकाणी आली. ती महिला भेटल्यानंतर त्या व्यक्तीच्या पत्नी आणि बहिणीने तिला फोटोबद्दल विचारणा केली. फोटो कुठून घेतला आणि एस्कॉर्ट साईटवर अपलोड का केला? अशी विचारणा त्यांनी तिला केली.
यावेळी रेशमा यादव ही महिला त्या दोघींशी भांडणं करायला लागली. नंतर तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्या तिघांनी महिलेला पकडलं आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेले.
पोलिसांनी सदरील महिलेची चौकशी केली. त्यानंतर तिच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. रेशमा यादव या महिलेला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या महिलेनं सोशल मीडियावरून फोटो घेऊन अपलोड केले होते. दरम्यान, पोलिसांनी महिला व तरुणींना सोशल मीडियावर फोटो शेअर करताना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.