Mrunal Thakur: मृणाल ठाकुरच्या नव्या चित्रपटाची घोषणा;

- मुख्यपृष्ठ
- करमणूक  / बॉलीवूड – bollywood news
- Mrunal Thakur: मृणाल ठाकुरच्या नव्या चित्रपटाची घोषणा; ‘नानी-30’ मध्ये साकारणार भूमिका
Mrunal Thakur: मृणाल ठाकुरच्या नव्या चित्रपटाची घोषणा; ‘नानी-30’ मध्ये साकारणार भूमिका
नानी- 30 (Nani 30) हा तेलगू चित्रपट आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे.
Mrunal Thakur
Mrunal Thakur Work With Nani: अभिनेत्री मृणाल ठाकुरसाठी (Mrunal Thakur) 2022 हे वर्ष अतिशय खास होतं. जर्सी, सिता रामन हे मृणालचे चित्रपट 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आले. मृणाल तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. मृणालच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. मृणाल ही नानी-30 (Nani 30) या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. नानी 30 हा तेलगू चित्रपट आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे.
नानी 30 या चित्रपटाची निर्मिती मोहन चेरुकुरी (सीवीएम), डॉ. विजेंदर रेड्डी तेगला आणि मूर्ति के.एस यांनी केलं आहे. या चित्रपटाला संगीत हे मल्याळम संगीतकार हेशम अब्दुल वहाब यांनी दिलं आहे. या चित्रपटात अभिनेता नानीसोबत मृणाल ही स्क्रिन शेअर करणार आहे.
मृणालनं नानी-30 या चित्रपटाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करुन मृणालनं त्याला कॅप्शन दिलं, ‘The love we give away is the love we keep’
पाहा फर्स्ट लूक:
News Reels
गेल्या वर्षी अभिनेता नानीचे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. सुंदरनिकी या चित्रपटामधील नानीच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. नानीनं हिट: द सेकंड केस चित्रपटामध्ये देखील काम केलं. त्याने HIT2 ची निर्मितीही केली. नानीच्या आगामी चित्रपटांमध्ये ‘दसरा’चा समावेश आहे. या चित्रपटामध्ये तो किर्ती सुरेशसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. दसरा आणि नानी 30 या अभिनेता नानीच्या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन नवोदित दिग्दर्शक करत आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Alia Bhatt : “आई होण्याच्या निर्णयाचा मला कधीही प्रश्चाताप होणार नाही”; ट्रोलिंगवर आलियाचं सडेतोड उत्तर