MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी गुडन्यूज, राज्यात लवकरच तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांची भरती

mpsc-च्या-विद्यार्थ्यांसाठी-गुडन्यूज,-राज्यात-लवकरच-तलाठी-आणि-मंडळ-अधिकाऱ्यांची-भरती

राज्यात लवकरच तलाठी पदाची भरती होणार आहे. तीन हजाराहून अधिक पदासाठी ही भरती होणार आहे.

MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी गुडन्यूज, राज्यात लवकरच तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांची भरती

Talathi bharti 2022

शैलेश मुसळे

शैलेश मुसळे |

Dec 07, 2022 | 9:54 PM

मुंबई : एमपीएससी (MPSC Exam 2022) विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्यात लवकरच तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांची पदभरती होणार आहे. ज्यामध्ये तलाठीच्या 3 हजार 110 पदासांठी तर मंडळ अधिकाऱ्यांची 511 पदांसाछी भरती होणार आहे. महसूल विभागाच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. राज्य शासनाने याबाबत आदेश काढला आहे. (Talathi Bharti Update 2022)

डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारी महिन्यात या भरतीबाबत जाहिरात निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या तरुणांसाठी ही गुडन्यूज आहे. तलाठी आणि मंडळ अधिकारी (Talathi and Mandal Adhikari) या पदांसाठी जे उमेदवार इच्छूक आहेत. त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे.

तलाठी (Talathi Bharti) हे पद ग्रामीण भागात महत्त्वाचे असते. तलाठी (Talathi Requirments 2022 Maharashtra) ला देखील अनेक अधिकार असतात. राज्यात अनेक वर्षांपासून तलाठी भरती झाली नाहीये. त्यामुळे आता इच्छूकांसाठी ही मोठी संधी असणार आहे.

Non Stop LIVE Update

Most Read Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *