Manasi Tata: टाटांच्या सूनबाई मानसी टाटा नक्की आहेत तरी कोण?

manasi-tata:-टाटांच्या-सूनबाई-मानसी-टाटा-नक्की-आहेत-तरी-कोण?

How is Manasi Tata: आज रतन टाटा (Ratan Tata Birthday) यांचा 85 वा वाढदिवस आहे. आपल्या या प्रदीर्घ आयुष्यात त्यांनी अनेक चढउतार पाहिले आहेत आणि या सगळ्यात मात करत आज त्यांनी ओळख जगभरात एक यशस्वी उद्योजक (Tata-Kirloskar) म्हणून अद्यापही कायम आहे. 

Updated: Dec 28, 2022, 01:49 PM IST

How is Manasi Tata: आज रतन टाटा (Ratan Tata Birthday) यांचा 85 वा वाढदिवस आहे. आपल्या या प्रदीर्घ आयुष्यात त्यांनी अनेक चढउतार पाहिले आहेत आणि या सगळ्यात मात करत आज त्यांनी ओळख जगभरात एक यशस्वी उद्योजक (Tata-Kirloskar) म्हणून अद्यापही कायम आहे. त्यांच्या वाढदिवशी अजून एक टाटा चर्चेत आली आहे. तिचं नावं आहे मानसी टाटा (Manasi Tata). इनोव्हा तयार करणाऱ्या मोठ्या कंपनीचा डोलारा त्या सांभाळणार आहेत. पण मानसी टाटा नक्की आहेत तरी कोण आणि त्यांचं आणि रतन टाटा यांचे काय कनेक्शन आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला लागली असेलच. तेव्हा रतन टाटांच्या जन्मदिनानिमित्त जाणून घेऊया मानसी टाटांबद्दल. मानसी टाटा या टाटांच्या सूनबाई आहेत आणि त्यांच्या इनोव्हा बनवणाऱ्या कंपनीची मोठी जबाबदारीही देण्यात आली आहे. मानसी टाटा यांनी तरूण वयातच मोठी उंच भरारी मारली आहे. 

किर्लोस्कर – टाटा नातं काय? 

गेल्या महिन्यातच विक्रम किर्लोस्कर (Vikram Kirloskar Death) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर मानसी टाटा यांच्याकडे किर्लोस्कर समूहाची जबाबदारी नेमण्यात आली असून किर्लोस्कर जॉईंट व्हेंचरच्या बोर्डाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मानसी टाटा यांच्या आई गीतांजली किर्लोस्कर (Geetanjali Kirloskar) किर्लोस्कर सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेडच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. मानसी या विक्रम किर्लोस्करांच्या एकूलती एक कन्या आहेत. किर्लोस्करांची लेक असण्यासोबतच त्या टाटा कुटुंबियांच्या सुनबाई देखील आहे. 

2019 मध्ये मानसी यांचा विवाह नोएल टाटा यांचा मुलगा नेविल टाटा याच्याशी झाला. त्यांचं लग्न हे अतिशय साध्या पद्धतीनं करण्यात आलं. काही निवडक लोकंच त्यांच्या लग्नाला उपस्थित होते. टाटा आणि किर्लोस्कर यांची मैत्री अनेक दशकांपासून आहे. नोएल हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. ते टाटा ग्रुपची रिटेल कंपनी ट्रेंट लिमिटेड यांचा कारभार पाहतात. 

कोण आहेत मानसी टाटा ? 

मानसी टाटा या 32 वर्षांच्या आहेत. त्यांनी अमेरिकेतील रोड आयलँड स्कूल ऑफ डिझाइन पदवी संपादन केली आहे. त्यांना कलेची आवड आहे. त्या केअरिंग विथ कलर नावाचा एनजीओदेखील चालवतात. चित्रकलेसोबतच त्यांना पोहण्याचीदेखील आवड आहे. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्या त्यांच्या वडिलांच्या कंपनीत रूजू झाल्या. मानसी यांनी किर्लोस्कर ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालक, कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. आता त्या टोयोटा मटेरियल हॅंडलिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, किर्लोस्कर टोयोटा टेक्सटाईल प्रायव्हेट लिमिटेड, टोयोटा इंजिन इंडिया लिमिटेड आणि काही कंपन्यांचा प्रमुख कारभार सांभाळत आहेत.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *