Maharashtra Winter Session 2022 Live : आज अधिवेशनात कोणता विषय गाजणार? विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष

भीमराव गवळी
Updated on: Dec 22, 2022 | 6:05 AM
Maharashtra Winter Session 2022 Live Updates : आज अधिवेशनात कोणता विषय गाजणार? विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष
आज अधिवेशनात कोणता विषय गाजणार? विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष
Image Credit source: tv9 marathi
मुंबई: नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील विविध प्रश्नांवर विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार चर्चा घडत आहे. आजही अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येण्याची चिन्हे आहेत. कोणत्या मुद्द्यावर विरोधक आज सत्ताधाऱ्यांना घेरतात आणि सत्ताधारी त्यांना कसे उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या अपडेट्ससह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि ताज्या बातम्यांचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.