Maharashtra News Live : गोंदियात जिल्हा परिषदेच्या शाळेत अग्नि तांडव, मध्यरात्री लागली आग

maharashtra-news-live-:-गोंदियात-जिल्हा-परिषदेच्या-शाळेत-अग्नि-तांडव,-मध्यरात्री-लागली-आग
 • 25 Jan 2023 06:43 AM (IST)

  माघी गणेश जयंती निमित्त मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी

  सिद्धिविनायक मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे

  तसेच विविध पालख्या देखील आज सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येत आहेत

  सिद्धिविनायक मंदिरात माघी गणेशोत्सव 22 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान साजरा करण्यात येत आहे

  श्री सिद्धिविनायकाची रथयात्रा श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरातून दुपारी 3.30 वाजता निघणार आहे

 • 25 Jan 2023 06:41 AM (IST)

  नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला अमरावती स्पेशल कॉरिडॉरद्वारे जोडण्याची मागणी

  नांदगाव खंडेशवर तालुक्यातील शिवणी रसुलापूर येथून 44 किलोमीटर अंतरावर कॉरिडॉर शक्य

  अमरावतीवरून समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी तीन पर्याय

  अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या व व्यापाऱ्यांच्या फायदाचा ठरू शकतो स्पेशल कॉरिडॉर

 • 25 Jan 2023 06:40 AM (IST)

  पदवीधर निवडणुकीमुळे अमरावतीत तीन दिवस ड्राय डे

  अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील मद्यविक्री 28 ते 30 तारखेपर्यत राहणार बंद

  बार, वाईन शॉपीसह सर्व दारू दुकाने राहणार बंद

  ड्राय डे विरोधात बार मालक न्यायालयाय याचिका दाखल करण्याची शक्यता

  निवडणूक आयोगाने दिले राज्य उत्पादन शुल्क विभागाला पत्र

 • 25 Jan 2023 06:37 AM (IST)

  पुणे-सातारा महामार्गवरील व्यावसायिकांकडून खंडणी मागणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल

  खेड शिवापूर इंडस्ट्रियल एरियातील व्यावसायिकांकडे मागितली खंडणी

  कार्तिक धुमाळ, प्रमोद सूर्यवंशी आणि उत्कर्ष कोंडे अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावं

  खेड शिवापूरच्या राजगड पोलीस स्टेशन गुन्हा दाखल

  काही दिवसांपासून व्यावसायिकांना खंडणी मागणे, भंगार देण्यासाठी दमदाटी करणे, रस्त्यात अडविणे, मारहाण करणे, असे घडत होते प्रकार

  या त्रासाला कंटाळून व्यावसायिकांनी पुणे ग्रामीण पोलिस आयुक्तांना दिलं होतं निवेदन

  निवेदनानंतर राजगड पोलिसांची कारवाई

 • 25 Jan 2023 06:31 AM (IST)

  गोंदियात जिल्हा परिषदेच्या शाळेत अग्नि तांडव, मध्यरात्री लागली आग

  आमगाव शहराच्या लगतच असलेली जिल्हा परिषदेच्या शाळेत रात्री अचानक आग लागली

  आगीमुळे जुनी कवेली लाकडाची इमारत संपूर्ण जळून खाक झाली

  आगचं कारण सध्या अस्पष्ट, कोणतीही जीवित हानी नाही

  वर्गातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *