Maharashtra Gram Panchayat Sarpanch List 2022: तुमच्या गावचा

maharashtra-gram-panchayat-sarpanch-list-2022:-तुमच्या-गावचा

News

  • मुख्यपृष्ठ
  • बातम्या &nbsp/ महाराष्ट्र
  • Maharashtra Gram Panchayat Result 2022 : तुमच्या गावचा ‘कारभारी’ कोण? पाहा एका क्लिकवर

maharashtra gram panchayat election result 2022 winner list : ग्रामपंचायतींच्या निकालात महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे गटात काँटे की टक्कर,

By: एबीपी माझा वेब टीम | Updated at : 20 Dec 2022 12:13 PM (IST)

Edited By: श्रद्धा भालेराव

Maharashtra Gram Panchayat election result 2022 Complete winning list Sarpanch and members name List 2022 Marathi News Maharashtra Gram Panchayat Result 2022 : तुमच्या गावचा 'कारभारी' कोण? पाहा एका क्लिकवर

Maharashtra Gram Panchayat Sarpanch List 2022

Maharashtra Gram Panchayat Election Result Live Updates : राज्यातील सात हजारांहून अधिक ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अशातच राज्यातील 34 ठिकाणी 616 ग्रमपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. तर अनेक ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. 

महाराष्ट्रात अनेक ग्रामपंचायत निवडणुकांचा आज निकाल लागला आहे. मराठवाड्यात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उस्मानाबादमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली असून प्रचंड संघर्ष असलेल्या राणाजगजीतसिंह आणि ओमराजे निंबाळकरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बीडच्या नाथ्रा गावात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते कधी नव्हे ते एकत्र आलेत. चुलत बंधू अभय मुंडे यांच्या विजयासाठी पंकजा आणि धनंज मुंडेंचे कार्यकर्त्यांची एका पाहायला मिळाली तर नवगण राजुरी येथे जयदत्त क्षीरसागर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. औरंगाबादेत संदीपान भुमरे यांनी ताकद लावलीय. तिथं महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे गट असा सामना रंगलाय. जालन्यातील जवखेडा या गावात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रयत्न करूनही तीस वर्षांची बिनविरोध निवडणुकीची परंपरा खंडित झालीय. माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मतदारसंघातील कुंभार पिंपळगावच्या निकालांकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय. परभणीच्या जिंतूरमध्ये भाजप आमदार मेघना बोर्डिकर विरुद्ध राष्ट्रवादीच्या विजय भांबळे यांनी ताकद लावली आहे.

Maharashtra Gram Panchayat Result 2022 : कोकणात शिंदे-भाजप गटातील नेत्यांमध्ये थेट चुरस

कोकणामध्येही दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. रायगड जिल्ह्यातील एकूण 240 ग्रामपंचयतींपैकी 50 ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या आहेत.  रायगड जिल्ह्यात भरत गोगावलेंची प्रतिष्ठा पणाला लागलीये. मतदार राजा नेमका कुणाला कौल देणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलंय. रत्नागिरीतल्या मालगुंड ग्रामपंचायतमध्ये होणारी लढत ही प्रतिष्ठेची असणार आहे कारण या ठिकाणी शिंदे विरुद्ध ठाकरे गट अशी सरळ लढत होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडा, पिंगुळी, माणगाव, कलमट, नांदगाव या महत्वाच्या ग्रामपंचायती आहेत. यातील सर्वच ग्रामपंचायत राणेंकडे आहेत. मात्र या ग्रामपंचायती राणेंना भाजपकडे वळवणे मोठ्या जिकरीचे बनलं आहे. त्याला कारण अंतर्गत गटबाजी, त्यामुळे या महत्वाच्या ग्रामपंचायत कोणाकडे जातात हे पाहणं महत्वाचे आहे. 

उत्तर महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस

News Reels

अनेक दिग्गजांनी ताकद लावल्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झालीय. पालकमंत्री दादा भुसे यांचं मालेगाव, छगन भुजबळ यांचा येवला, शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या नादगावमध्ये अनेक ग्रामपंचातींच्या निकालांकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. तर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या दिंडोरी मतदारसंघातही सात ग्रामपंचायतींचे निकाल लक्षवेधी ठरले आहेत. तर तिकडे अहमदनगरच्या जामखेडमध्ये आमदार रोहित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. आमदार निलेश लंके, बाळासाहेब थोरात, विखे-पाटील यांनीही अनेक ग्रामपंचायत निवडणुकीत ताकद लावलीय. तर तिकडे गिरीश महाजन आणि खडसेंच्या मतदारसंघातही अनेक ग्रामपंचायत निकालांकडे लक्ष लागलंय.

Maharashtra Gram Panchayat Sarpanch List 2022 : राज्यातील सर्व ग्रामपंचायतींची यादी 

Maharashtra Gram Panchayat List 2022
District Name Number of Gram Panchayat Sarpanch Name
Ahmednagar 203 TBA
Akola 266 TBA
Amravati 257 TBA
Aurangabad 219 TBA
Beed 704 TBA
Bhandara 363 TBA
Buldana 279 TBA
Chandrapur 59 TBA
Dhule 128 TBA
Gadchiroli 27 TBA
Gondia 348 TBA
Hingoli 62 TBA
Jalgaon 140 TBA
Jalna 266 TBA
Kolhapur 475 TBA
Latur 351 TBA
Nagpur 237 TBA
Nandurbar 123 TBA
Osmanabad 166 TBA
Palghar 63 TBA
Parbhani 128 TBA
Pune 221 TBA
Raigad 240 TBA
Ratnagiri 222 TBA
Sangli 452 TBA
Satara 319 TBA
Sindhudurg 325 TBA
Solapur 189 NCP’s Apparao Kore
Thane 42 TBA
Wardha 113 TBA
Washim 287 TBA
Yavatmal 100 TBA
Nanded 181 TBA
Nashik 196 TBA

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Maharashtra Gram Panchayat Election Results 2022 Live Updates: राज्यभरातल्या 7 हजार 135 ग्रामपंचायतींचा निकाल येण्यास सुरुवात, मविआ आणि भाजप-शिंदे गटात चुरशीची लढत

Published at : 20 Dec 2022 12:04 PM (IST) Tags: Gram Panchayat elections Maharashtra Politics Maharashtra Gram Panchayat Election 2022 GRAM PANCHAYAT ELECTION RESULT 2022

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *