Maharashtra Breaking News Live : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर…

maharashtra-breaking-news-live-:-दिवसभरातील-महत्वाच्या-घडामोडी,-वाचा-एका-क्लिकवर…
  • 01 Jan 2023 06:07 AM (IST)

    2022 चा निरोप घेतल्यानंतर आता नवीन वर्ष 2023 चे आगमन झालंय

    नव वर्ष साजरे करण्यासाठी मुंबईतील अनेक पर्यटनस्थळांवर लोकांनी गर्दी केली होती

    मढ मार्वे रोडवर लोकांची प्रचंड गर्दी झाली होती

    नवीन वर्ष साजरे करण्यासाठी लोक येत आहेत आणि जात आहेत

    मुंबईतूनच नाही तर देशाच्या विविध राज्यातून लोक नवीन वर्ष साजरे करण्यासाठी मढला आले

  • 01 Jan 2023 06:05 AM (IST)

    31st नंतर भायखळ्यात नाकाबंदी / विधानभवनाचे स्टिकर लावणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

    मुंबईतील भायखळ्यात नवीन वर्षाचे आगमन होताच पोलीस नाकाबंदी करून कारवाई करताना दिसत होते

    नाकाबंदीदरम्यान बहुतांश वाहनांवर विधानभवनाचे स्टिकर्स आणि काळी फिल्म दिसून आली

    तपासाअंती पोलिसांनी स्वतः उभे राहून विधानभवनाचे स्टिकर आणि काळी फिल्म हटवली

  • 01 Jan 2023 06:03 AM (IST)

    कोरेगाव भीमा येथे शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याला सुरुवात

    विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून आंबेडकरी अनुयायी कोरेगाव भीमामध्ये दाखल

    शौर्यदिनाचे यंदाचे 205 वे वर्ष,

    शौर्यदिनाची जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी

  • 01 Jan 2023 05:57 AM (IST)

    विदेशी पाहुण्यांनी मुंबईत जल्लोषात केलं नव वर्षाचं स्वागत

    बुर्ज खलिफा, अमेरिका, कॅनडा या देशातील नागरिक मुंबईत

    दादरच्या छत्रपती शिवाजी पार्कवर फटाक्यांची आतिषबाजी करत नाचत नवीन वर्षाचे केले स्वागत

    2023 मध्ये कोविडचे संकट भारतावर येऊ नये म्हणून विदेशी पाहुण्यांनीही देवाकडे घातले साकडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *