Loan आणि Credit Card न घेताही खराब होतो CIBIL Score

loan-आणि-credit-card-न-घेताही-खराब-होतो-cibil-score

क्रेडिट कार्ड न वापरता किंवा कर्ज न घेताही तुमच्या CIBIL स्कोअरवर परिणाम होऊ शकतो.

जर तुम्ही कधीही कर्ज किंवा क्रेडिट कार्ड वापरले नसेल, तर तुमचा क्रेडिट स्कोअरचा इतिहास कंपन्यांकडे उपलब्ध नसतो. यामुळे, क्रेडिट कंपन्यांच्या दृष्टीने तुमचा CIBIL स्कोर शून्य होतो.

शून्य CIBIL स्कोअर असलेल्या लोकांना बँका कर्ज देण्याच्या मनस्थितीमध्ये नसतात. कारण ती व्यक्ती विश्वासार्ह आहे की नाही हे कसं ठरवायचं? हा प्रश्न कंपन्यांपुढे उभा राहतो.

क्रेडिट स्कोअरवर परिणाम न होण्यासाठी आणि तुम्हाला कर्ज मिळविण्यात अडचण न येण्यासाठी काही उपायही आहेत.

वॉशिंग मशीन, मोबाईल आणि टीव्ही यासारख्या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही EMI वर घ्या आणि त्याचे हप्ते भरत राहा.

यामुळे तुमचा CIBIL स्कोर कायम राहील आणि तुम्हाला भविष्यात बँकेकडून कर्ज घ्यायचे असेल तर ते तुम्हाला सहज मिळेल.

300 ते 900 पर्यंत क्रेडिट स्कोअर असतो, सर्वोत्तम क्रेडिट स्कोअर 750 च्या वर असतो. तर 550 आणि 750 मधील CIBIL स्कोअर हा चांगला स्कोअर मानला जातो. 300 ते 550 दरम्यानचा क्रेडिट स्कोअर वाईट मानला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *