Lionel Messi: आपण विचारही करणार नाही एवढं महाग आहे मेस्सीचं घर, संपत्ती माहितेय किती?

फिफा वर्ल्ड कपमध्ये गोल्डन बूटच्या शर्यतीतील प्रबळ दावेदार असलेला मेस्सी मैदानाबाहेरही मस्त आयुष्य जगतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मेस्सीकडे जगभरात 23 मिलियन पौंड (सुमारे 234 कोटी रुपये) किमतीची आलिशान घरे आहेत.
(instagram/leomessi)
गोल डॉट कॉमच्या मते, मेस्सीची एकूण संपत्ती $ 400 दशलक्ष (सुमारे 3268 कोटी रुपये) आहे. फोर्ब्सच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मेस्सीने अव्वल स्थान पटकावले आहे.
(instagram/leomessi)
मेस्सीची जगभरात 4 ठिकाणी आलिशान घरे आहेत. सर्वात महागडे घर स्पेनजवळील इबिझा बेटावर आहे. त्याची किंमत 9.5 दशलक्ष पौंड (सुमारे 97 कोटी रुपये) आहे.
(instagram/leomessi)
मेस्सीचा बार्सिलोनामध्ये 5.5 मिलियन पौंड (सुमारे 56 कोटी रुपये) किमतीचा बंगलाही आहे. मेस्सीची पत्नी अँटोनेला रोकुझो आणि त्यांच्या तीन मुलांनाही हे घर आवडते.
(instagram/leomessi)
मेस्सीने अमेरिकेतील मियामी येथे एक अपार्टमेंटही खरेदी केले असून त्याची किंमत 5 मिलियन पौंड (सुमारे 51 कोटी रुपये) आहे. अपार्टमेंटमधून सुंदर समुद्राचे दृश्य दिसतं.
(instagram/leomessi)
मेस्सीचे अर्जेंटिनामध्येही आलिशान घर आहे. रोसारियो येथील या बंगल्याची किंमत 3 मिलियन पौंड (सुमारे 31 कोटी रुपये) आहे.
(instagram/leomessi)