Lionel Messi : अर्जेंटिनाचा फुटबॉल खेळाडू लिओनल मेस्सीची संपत्ती किती? राजेशाही थाटला मेहनतीचं कोंदण..

lionel-messi-:-अर्जेंटिनाचा-फुटबॉल-खेळाडू-लिओनल-मेस्सीची-संपत्ती-किती?-राजेशाही-थाटला-मेहनतीचं-कोंदण.

Lionel Messi : अर्जेंटिनाचा फुटबॉल खेळाडू लिओनल मेस्सीची संपत्ती किती? राजेशाही थाटला मेहनतीचं कोंदण..

कमाईचा आकडा जोरदार

Image Credit source: सोशल मीडिया

नवी दिल्ली : फुटबॉलमध्ये लिओनल मेस्सीची (Lionel Messi) क्रेझ कायम आहे. त्याच्या खेळावर जगभरातील फॅन्स फिदा आहे. फिफा विश्व चषकात (FIFA World Cup) तो अंतिम सामन्यात नशीब आजमावत आहे. या स्टार फुलबॉलरची मैदानावरची कामगिरी जशी सरस आहे, तसेच मैदानाबाहेरचं त्याचं आयुष्य जोरदार आहे. तो दिलखुलास आयुष्य जगतो. त्याची जीवनशैली हेवा वाटावं अशी आहे. तो जगातील सर्वाधिक कमाई (Highest Earner) करणारा खेळाडू आहे. क्लब आणि आंतरराष्ट्रीय सामन्यातून तर तो कमाई करतोच, पण जाहिरातींच्या माध्यमातूनही तो मोठं उत्पन्न कमावतो.

मेस्सीची एकूण संपत्ती 600 दशलक्ष डॉलर्स म्हणजे जवळपास 4952 कोटी रुपये आहे. अनेक दाव्यांनुसार, मेस्सीची एका दिवसाची कमाई जवळपास 1,05,000 डॉलर इतकी आहे. मेस्सी तसा भपकेबाज खेळाडू नाही. तो सार्वजनिक जीवनात उथळपणा करत नाही. पण याचा अर्थ तो अलिशान जीवन जगत नाही, असे नाही.

अर्जेंटिनामधील फ्लाई जोनमध्ये त्याचा अलिशान बंगला आहे. इतर ठिकाणीही त्याचे बंगले आणि घर आहेत. जगभरातील त्याच्या घरांची एकूण किंमत जवळपास 234 कोटी रुपये आहे. त्याच्याकडे जवळपास 100 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. तो एका हॉटेलचा मालक आहे.

सर्वात कमाई करणाऱ्या जागतिक खेळांडुंमध्ये मेस्सीचा क्रमांक सर्वात वरचा आहे. फोर्ब्सच्या दाव्यानुसार, मेस्सी दरवर्षी जवळपास 13 कोटी डॉलर म्हणजे जवळपास 1075 कोटी रुपयांची कमाई करतो. यातील मोठे उत्पन्न तो जाहिरातीतून कमावतो. 5.5 कोटी डॉलरची कमाई अॅथेलेटिक्स कामातून होते.

तो बार्सिलोना सोडून पॅरिस येथे खेळायला आला तेव्हा तो दिवसाकाठी 2.2 कोटी डॉलरची कमाई करत होता. ही रक्कम बार्सिलोना येथे होणाऱ्या कमाईपेक्षा कमी होती. मेस्सीने त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशी लग्न केले आहे आणि त्याला तीन मुले आहेत. त्याच्या पत्नीचे नाव एंटोनेला रोक्कुजो आहे. त्याने त्याच्या करिअरमध्ये 85 हून अधिक गोल केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *