LIC : ही योजना संपवेल उतारवयातील कमाईचे टेन्शन, एका वेळी जोरदार प्रिमियम भरल्यानंतर देईल 52 हजार रुपयांची पेन्शन..

lic-:-ही-योजना-संपवेल-उतारवयातील-कमाईचे-टेन्शन,-एका-वेळी-जोरदार-प्रिमियम-भरल्यानंतर-देईल-52-हजार-रुपयांची-पेन्शन.

LIC : केवळ एकदाच गुंतवणूक करुन तुम्ही सुखाची संध्याकाळ अनुभवू शकता..

LIC : ही योजना संपवेल उतारवयातील कमाईचे टेन्शन, एका वेळी जोरदार प्रिमियम भरल्यानंतर देईल 52 हजार रुपयांची पेन्शन..

आयुष्याची संध्याकाळ होईल सुखी

Image Credit source: सोशल मीडिया

नवी दिल्ली : सेवा निवृत्तीनंतरही नियमीत कमाईसाठी (Regular Income) काहीतरी तजवीज करणे आवश्यक असते. त्यासाठी एलआयसीची पेन्शन योजना (Pension Plan) महत्वपूर्ण आहे. कारण या योजनेत एक निश्चित रक्कम महिन्याकाठी मिळते. त्यामुळे एलआयसीची जीवन सरल योजना (LIC Jeevan Saral Plan) एक चांगला पर्याय ठरु शकते. ही योजना तुम्हाला उतारवयात दर महिन्याला एक निश्चित रक्कम देईल. या योजनेतंर्गत तुम्हाला वार्षिक, सहामाही आणि तिमाही आधारावर पेन्शन मिळू शकते. तुम्हाला पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.

LIC जीवन सरल योजनेत 40 ते 80 वयोगटातील कोणतीही व्यक्ती गुंतवणूक करु शकते.जीवन सरल प्लॅन (LIC Jeevan Saral Plan) अंतर्गत एक रक्कमी प्रीमियम जमा करता येतो आणि दर महिन्याला 50 हजार रुपयांची पेन्शन मिळविता येते. त्यामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळविता येतो.

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या दिशा निर्देशकानुसार ही योजना तयार करण्यात आली आहे. त्यामुळे विमाधारकांना त्याच्या गरजेच्या काळात मोठी मदत मिळते. जेवढी मोठी रक्कम तुम्ही गुंतवाल, तेवढी दरमहा पेन्शन मिळते.

जीवन सरल योजना एलआयसीच्या अधिकृत संकेतस्थळावरुन www.licindia.in वरुन खरेदी करता येते. तसेच एलआयसीच्या कोणत्याही कार्यालयातून, शाखेतून ऑफलाईन पद्धतीने ही विमा योजना खरेदी करता येते. या योजनेतंर्गत विमाधारकाला दरमहा, तिमाही, सहामाही आणि वार्षिक आधारावर पेन्शन प्राप्त करता येते.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने या योजनेत 10 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला वार्षिक 52 हजार रुपयांची पेन्शन मिळते. त्याला ही रक्कम मासिक रुपातही प्राप्त करता येते. या योजनेत दरमहा 12 हजार रुपयांची पेन्शन मिळविता येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *