Kylian Mbappé Love Story: पुरुषाची स्त्री बनलेल्या मॉडेलच्या प्रेमात पडला फ्रान्सचा स्टार फुटबॉलर एमबाप्पे

kylian-mbappe-love-story:-पुरुषाची-स्त्री-बनलेल्या-मॉडेलच्या-प्रेमात-पडला-फ्रान्सचा-स्टार-फुटबॉलर-एमबाप्पे

Kylian Mbappé Love Story: पुरुषाची स्त्री बनलेल्या मॉडेलच्या प्रेमात पडला फ्रान्सचा स्टार फुटबॉलर एमबाप्पे

Kylian Mbappé ines rau

Image Credit source: AFP/Instagram

दोहा: फ्रान्सचा सुपरस्टार फुटबॉलपटू कीलियन एम्बाप्पेने अर्जेंटिना विरुद्ध फिफा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये हॅट्रिक केली. तो आपल्या टीमला विश्वविजेता बनवू शकला नाही. पण फायनलमध्ये 8 गोल करुन गोल्डन बूट जिंकण्यात यशस्वी ठरला. लियोनल मेस्सी इतकीच एम्बाप्पेची संपूर्ण जगात चर्चा आहे. एम्बाप्पे फुटबॉलपटू म्हणून कसा घडला? त्याच बरोबर त्याच्या खासगी आयुष्याबद्दल बरीच चर्चा आहे. ट्रान्सजेंडर मॉडेल इनेस राऊसोबतच्या त्याच्या रिलेशनशिपची चर्चा आहे.

यॉटवर एकत्र मस्ती करताना पाहिलं

इनेस राऊ प्लेबॉयच्या कव्हरवर येणारी पहिली ट्रान्सजेंडर मॉडेल आहे. फ्रेंच मीडियाच्या एका रिपोर्ट्नुसार एम्बाप्पे राऊला डेट करतोय. एम्बाप्पे आणि राऊला अनेकदा एकत्र पाहिलं गेलय. काही दिवसांपूर्वी दोघांना एका यॉटवर एकत्र मस्ती करताना पाहिलं होतं. एम्बाप्पने इनेसला उचलून घेतल्याचा फोटो व्हायरल झाला होता.

कधी केली लिंग बदल शस्त्रक्रिया

32 वर्षाच्या इनेस राऊचा जन्म एक मुलगा म्हणून झाला होता. त्याचं नाव मारियो होतं. पण वयाच्या 16 व्या वर्षी लिंग बदल शस्त्रक्रिया करुन मारियोची इनेस झाली. नोव्हेंबर 2017 मध्ये प्लेबॉयच्या कव्हर पेजवर आल्यानंतर राऊला प्रसिद्धी मिळाली. मेन्स मॅग्झीनच्या कव्हर पेजवर येणारी ती पहिली ट्रान्सजेंडर महिला बनली.

एम्बाप्पेकडून गोलची हॅट्रिक

इनेस राऊच नाव आता कीलियन एम्बाप्पे बरोबर जोडलं जातय. एम्बाप्पेने काल वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये अर्जेंटिना विरुद्ध एकट्याने तीन गोल लगावले. पण तो टीमला विश्वविजयी बनवू शकला नाही. त्याची झुंज एकाकी ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *