Kobad Ghandy यांच्या

- मुख्यपृष्ठ
- व्हिडीओ  / महाराष्ट्र
- Kobad Ghandy यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ पुस्तकाला दिलेला पुरस्कार रद्द, लेखकांकडून निषेध
कोबाड गांधी लिखित आणि अनघा लेले यांनी मराठीत अनुवाद केलेल्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाला राज्य शासनाने दिलेला पुरस्कार एक जीआर काढून अचानक रद्द केलाय. पुरस्कार रद्द करण्याचा हा निर्णय घेतल्यानंतर अनेक लेखकांकडून याचा निषेध करण्यात येतोय. ‘भुरा’ या कादंबरीचे लेखक शरद बाविस्कर यांनी राज्याने दिलेला पुरस्कार नाकारायचं ठरवलंय. तर, आनंद करंदीकर यांनी त्यांच्या ‘वैचारिक घुसळण’ या पुस्तकाला मिळालेला पुरस्कार नाकारायचं निश्चित केलंय. याशिवाय प्रज्ञा दया पवार आणि निरजा यांनी राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. पुरस्कार वापसीची आणि निषेधाची ही मालिका आणखी वाढण्याचीच शक्यता आहे.