Knowledge News: एसीमध्ये 'टन' हा प्रकार काय असतो? जाणून घ्या योग्य उत्तर

knowledge-news:-एसीमध्ये-'टन'-हा-प्रकार-काय-असतो?-जाणून-घ्या-योग्य-उत्तर

AC Ton: सोशल मीडियावर एका प्रश्नाची चर्चा रंगली आहे. एका युजर्सने विचारलेल्या प्रश्नामुळे सर्वच कामाला लागले आहेत. एसीमध्ये टन काय असते माहित आहे का? असा प्रश्न युजर्सने विचारला आहे. या प्रश्नाला अनेक जणांनी मजेशीर उत्तर दिली आहेत. चला तर जाणून घेऊयात टन म्हणजे काय असते?

Updated: Nov 25, 2022, 05:52 PM IST

What Is Ton in AC: सध्या हिवाळ्याचे दिवस सुरु असून एसीची तितकी गरज भासत नाही. उन्ह्याळ्यात तर एसीशिवाय जमत नाही. मात्र असं असलं तरी थंडी कमी झाली की लगेच एसी लावला. एसीमुळे तात्काळ उकाड्यापासून दिलासा मिळतो. काही जणांच्या घरात विंडो किंवा स्प्लिट एसी असते. एसीच्या सततच्या वापरामुळे वीज बिलातही मोठी वाढ होत आहे. त्यामुळे जरा सांभाळूनच एसी वापरतात. दरम्यान, सोशल मीडियावर एका प्रश्नाची चर्चा रंगली आहे. एका युजर्सने विचारलेल्या प्रश्नामुळे सर्वच कामाला लागले आहेत. एसीमध्ये टन काय असते माहित आहे का? असा प्रश्न युजर्सने विचारला आहे. या प्रश्नाला अनेक जणांनी मजेशीर उत्तर दिली आहेत. चला तर जाणून घेऊयात टन म्हणजे काय असते?

टन म्हणजे काय?

आपण दुकानात एसी घेण्यासाठी जातो तेव्हा दुकानदार विचारतो, किती टन एसी लावायचा आहे. त्याच्या या प्रश्नाने बरेच लोक गोंधळून जातात. टन म्हणजे एसीचं वजन असतं का? असाही अनेकांचा समज होतो. पण लहान एसीचं वजन 1000 किलो असू शकत नाही. त्यामुळे टन म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते? याबाबत संभ्रमात जातात. वास्तविक टन म्हणजे एसीची क्षमता. कोणत्याही एसीचा टन एका तासात एअर कंडिशनरद्वारे किती उष्णता काढली जाते, याबाबत सांगते. एसीची कूलिंग क्षमता टनवर अवलंबून असेल. लहान बेडरूमसाठी साधारणपणे एक टन एसीची शिफारस केली जाते, तर मोठ्या क्षेत्रफळाच्या खोल्यांसाठी अधिक टन आवश्यक असते. दुसरीकडे, एक टनाचा एसी एका दिवसात एक हजार किलो पाण्याचे बर्फात रूपांतर करतो, असं सांगितलं जातं.

बातमी वाचा- Apple, Microsoft आणि बर्कशायर Hathway कंपन्या सेकंदाला कमवतात इतके रुपये, जाणून घ्या

म्हणजेच एका दिवसात पाण्यामधून बर्फात रूपांतरित करण्यासाठी जी ऊर्जा काढावी लागते तिला टन म्हणतात. सध्या सोशल मीडियावर याची सर्व उत्तरे व्हायरल होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *