King Cobra
King Cobra

बँकॉक : या जगात विचित्र माणसांची काही कमतरता नाही. पाश्चात्त्य देशांमधील ‘पाळीव प्राण्यां’च्या यादीत चक्क मगर, कोळी आणि अजगरही असू शकतात. असे प्राणी घरी पाळणारे तिकडे अनेकजण आहेत. मात्र, या सगळ्यांवर कडी करणारा एका माणूस थायलंडमध्ये आहे. या तरुणाने चक्क एका नागिणीला आपली जीवनसाथी बनवले आहे. ही नागिणही साधी नसून ती ‘किंग कोब्रा’ प्रजातीची आहे. दहा फुटांच्या या किंग कोब्रासमवेत (King Cobra) तो टी.व्ही. पाहतो, कॅरम खेळतो, फिरायला जातो आणि जेवतो!

हा तरुण प्रत्येक क्षणी या कोब्राबरोबरच (King Cobra) असतो. त्यांची ही जोडी जमण्यामागे एक घटना आहे. या तरुणाच्या प्रेयसीचा पाच वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्याचे आपल्या प्रेयसीवर निरातिशय प्रेम होते. ती आपल्या जीवनात कोणत्या ना कोणत्या रूपात परत येईल अशी त्याला आशा होती. त्यानंतर त्याच्या जीवनात हा किंग कोब्रा आला आणि या नागिणीच्या रूपातच आपल्या प्रेयसीने पुनर्जन्म घेतला असल्याची त्याची भावना झाली.

त्यामुळे तो या दहा फुटांच्या कोब्रासमवेतच (King Cobra) राहतो. विशेष म्हणजे हा विषारी जीवही त्याला इजा पोहोचवत नाही आणि पाळीव प्राण्यासारखा त्याच्याबरोबर राहतो. हा तरुण या कोब्रा सह बसून रोज टी.व्ही. पाहतो, पिकनिकला जातो आणि कॅरमही खेळतो. दोघांची ही जोडी पाहून अनेक लोक थक्कही होतात आणि घाबरतातही. त्यांचे फोटो जगभर प्रसिद्ध आहेत.

हेही वाचा : 

  • Party Hard : तुम्हीही ‘Party animal’ असाल तर ‘हॉलिडे हार्ट सिंड्रोम’बाबत तुम्हाला ‘हे’ माहिती हवंच