Kasaba Peth By Poll : कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या

kasaba-peth-by-poll-:-कसबा-पेठ-पोटनिवडणुकीसाठी-राष्ट्रवादीच्या

मुक्ता टिळक ( Mukta Tilak ) यांचं 22 डिसेंबर रोजी निधन झालं. गेल्या दीड महिन्यांपासून पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

योगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे : भाजपच्या कसबा पेठ विधानसभा (Kasaba Peth Assembaly Constituency By Poll) मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. तेव्हापासून हा मतदारसंघ रिक्त आहे. आता मी या मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक असल्याचं राष्ट्रवादीच्या (Ncp) रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी म्हटलंय. पक्षाने तशी संधी दिल्यास मी निवडणूक लढवेन, असं रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटलं. (ncp rupali patil thombare is intrested for contested kasba peth by election after death to bjp mla mukta tilak pune news)

रुपाली पाटील-ठोंबरे काय म्हणाल्या?

“कसबा पोटनिवडणुक झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मला आदेश दिले तर मी निवडणूक लढवणार. मुक्ताताई 2019 विधानसभा निवडणूक आमदार झाल्यापासून आजारी होत्या. आजारी असतानाही त्यांनी शक्य तेवढं काम केलं”, असं रुपाली पाटील ठोंबरे यांनी नमूद केलं.

“अनेक ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या आहेत,अस दुःखद निधन झाल्यानंतर भावनिक म्हणून विचार होऊ शकतो, भाजपने अनेक ठिकाणी निवडणूक लावल्या आहेत, पंढरपूर,मुंबई मध्ये पोटनिवडणुक झाल्या. तसेच कसबा मतदारसंघात असंही कामं झाली नाहीत, खासदारही आजारी आहेत”, असंही रुपाली पाटील-ठोंबरे यांनी स्पष्ट केलं.

“मुक्ताताई यांच्या घरात तसेही कोणी निवडणूक लढवणार नाही. मुळात 2019 ला मनसेने माझं तिकीट मुक्ताताईसाठीच कापलं होतं”, अशी आठवणही रुपाली पाटील ठोंबरे यांनी सांगितली.

मृत लोकप्रतिनिधीच्या कुटुंबियातील सदस्याला पोटनिवडणुकीत बिनविरोध जिंकून देणं, ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती राहिली आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतही भाजपने मविआच्या उमेदवार आणि आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांच्याविरोधात उमेदवार दिला होता. मात्र वाढत्या राजकीय दबावानंतर भाजपनेही उमेदवार मागे घेतला होता. त्यामुळे आता राष्ट्रवादी पर्यायाने मविआ कसबा पेठ पोटनिवडणुकीत रुपाली पाटील ठोंबरे यांना उमेदवारी देणार की राज्याच्या राजकीय संस्कृतीची जाण ठेवत निवडणूक बिनविरोध करण्यात समर्थन देणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *