Kantara OTT Release

पुढारी ऑनलाईन : कांतारा हा या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट आहे. या कन्नड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ विक्रमच केले नाही, तर लोकांच्या हृदयात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. चित्रपटगृहांनंतर त्याच्या OTT रिलीजची आतुरतेने प्रेक्षक वाट पाहत आहेत. दक्षिण भारतीय भाषांमध्ये हा चित्रपट आधीच ओटीटीवर आला आहे, आता हिंदी आवृत्तीची रिलीज होण्याची जी प्रतीक्षा लागली होती ती आता संपली आहे. (Kantara OTT Release)

मंगळवारी, नेटफ्लिक्सने एका व्हिडिओच्या माध्यमातून कांताराची रिलीजची डेट जाहीर केली. नेटफ्लिक्सच्या या व्हिडिओच्या माध्यमातून अभिनेता व दिग्दर्शक ऋषभ शेट्टीने नेटफ्लिक्सवर कांताराच्या हिंदी आवृत्तीची रिलीजची घोषणा केली. (Kantara OTT Release)

कांतारा शुक्रवारी येणार हिंदीतऋषभने मुख्य भूमिकेसह चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाला देशभरात खूप प्रसिद्धी मिळाली. हा चित्रपट हिंदी पट्ट्यातही गाजत आहे. चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीच्या प्रमोशनसाठी ऋषभने उत्तर भारतातील शहरांचाही दौरा केला. कांतारा ९ डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर हिंदीमध्ये प्रदर्शित होत आहे. (Kantara OTT Release)

प्राइम व्हिडिओवर कन्नड आवृत्ती  (Kantara OTT Release)

KGF 2 नंतर या वर्षी प्रदर्शित होणारा कन्नड सिनेमातील दुसरा सर्वात जास्त चर्चेत असलेला कांतारा चित्रपट आहे. कांतारा कन्नडमध्ये 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्याची बरीच चर्चा झाली. सोशल मीडियावर या चित्रपटाचे खूप कौतुक झाले, ज्याचा परिणाम बॉक्स ऑफिसवरही दिसून आला. जगभरात सुमारे 425 कोटींची कमाई करणारा कांतारा 24 नोव्हेंबर रोजी दक्षिण भारतीय भाषांमध्ये प्राइम व्हिडिओवर स्ट्रीमिंग करण्यात आला आहे.

हिंदी पट्ट्यात 81 कोटी कलेक्शन

दक्षिण भारतीय भाषांनंतर हा चित्रपट 14 ऑक्टोबर रोजी हिंदीत प्रदर्शित झाला. कांताराने हिंदीमध्ये केवळ 1.27 कोटींची ओपनिंग घेतली. पण, नंतर माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर चित्रपटाचे कलेक्शन वाढतच गेले आणि जवळपास 81 कोटींचे नेट कलेक्शन फक्त हिंदी व्हर्जनने केले. कांताराचे अनेक सेलिब्रिटींनी कौतुकही केले होते. रजनीकांत यांनी ऋषभ शेट्टीला फोन करून त्याचे विशेष कौतुक केले.

वराहरुपम गीत ठरणार खास आकर्षण

कांतारा चित्रपट त्याच्या वराहरुपम या गाण्यावरूनही वादात सापडली होता. केरळमधील एका बँडने वराहरुपम गाण्यासाठी निर्मात्यांवर चोरीचा आरोप केला, त्यानंतर न्यायालयाने हे गाणे OTT वरून काढून टाकण्याचे आदेश दिले. पण, नुकतेच ऋषभने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले की तो केस जिंकला आहे आणि हे गाणे ओटीटीवर परत जोडले जात आहे, म्हणजेच हिंदीमध्ये चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांनाही हे गाणे पाहता येणार आहे.

अधिक वाचा :

  • Volodymyr Zelensky : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की ठरले ‘पर्सन ऑफ द इअर’
  • Bade Miyan Chote Miyan: अक्षय-टायगरच्या चित्रपटात साऊथ स्टारची धासू एन्ट्री
  • Heena Khan Breakup : हिना -रॉकीचं ब्रेकअप? तुटले १३ वर्षांचे नाते!