Isha Ambani : नातवांसोबत पोरगी माहेरी येणार म्हणून अंबानी खुश; 300 किलो सोनं करणार…

भारतातील सर्वात यशस्वी उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबासाठी आजचा दिवस खास आहे. मुकेश यांची मुलगी ईशा अंबानी आज आपल्या जुळ्या मुलांसह भारतात आली आहे. ईशा आणि तिच्या लाडक्या मुलांचे स्वागत करण्यासाठी अंबानी कुटुंबाने आधीच जोरदार तयारी केली होती. सर्वांचे भव्य स्वागत करण्यात आले. मुकेश अंबानी स्वतः मुलीला घ्यायला येणार असल्याचं बोललं जात होतं आणि तसंच झालं.
ईशा आणि तिच्या लेकरांसाठी होणार खास पूजापाठ
नोव्हेंबर 2022 मध्ये, ईशा अंबानीने तिच्या जुळ्या मुलांना, कृष्णा आणि आदिया यांना, लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया येथील सेडर सेनाई येथे जन्म दिला. मुलांच्या आगमनानंतर ईशा पहिल्यांदाच घरी आली आहे. अंबानी कुटुंबातील सदस्य आपल्या नातवंडांना भेटण्यासाठी उत्सुक होते. भारतातील विविध मंदिरांतील अनेक पंडितांना ईशा अंबानीच्या वरळीतील घरी, करुणा सिंधू येथे बोलावण्यात आले आहे. येथे लहान मुलांसाठी भव्य पूजापाठ आयोजित करण्यात आला आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आला आहे.
अंबानी कुटुंबिय 300 किलो सोनं करणार दान?
अंबानी कुटुंब मुलांच्या नावाने 300 किलो सोने दान करणार असल्याची चर्चा आहे. या पूजेच्या जेवणाचा मेनूही साधा नसतो. त्यात स्वयंपाक करण्यासाठी जगभरातून वेगवेगळ्या केटरर्सना बोलावण्यात आले आहे. अंबानी कुटुंब त्यांच्या घरातील भव्य सोहळ्यात तिरुपती बालाजी, तिरुमला, श्रीनाथजी, नाथद्वारा आणि श्री द्वारकाधीश आणि इतर ठिकाणांसारख्या भारतातील मोठ्या मंदिरांमधून विशेष प्रसाद देणार आहेत.
कतारच्या नेत्यानं पाठवली विशेष फ्लाईट
ईशा आणि तिची मुले कतारहून विमानाने मुंबईत आली आहेत. हे फ्लाइट स्वतः कतारच्या नेत्याने पाठवले होते, जो मुकेश अंबानींचा चांगला मित्रही आहे. मुंबईतील उत्तम डॉक्टरांचे पथकही लॉस एंजेलिसला पोहोचल्याचे बोलले जात आहे. या सर्वांनी आपल्या देखरेखीखाली ईशा आणि मुलांना मुंबईत आणले आहे.
8 ट्रेन असलेल्या आया अमेरिकेहून मुंबईत
अमेरिकेतील सर्वोत्कृष्ट बालरोगतज्ञांपैकी एक असलेले डॉ. गिब्सन हे देखील डॉक्टरांच्या टीमसोबत होते. जुळ्या मुलांचे उड्डाण सुरक्षित आहे याची खात्री करणे हे त्यांचे काम होते. तसेच मुलांची काळजी घेण्यासाठी 8 ट्रेन असलेल्या आया अमेरिकेहून मुंबईत आल्या आहेत. हे सर्वजण ईशा आणि मुलांसह भारतातच राहणार आहेत.
मुलांसाठी बनवण्यात आली खास नर्सरी
पर्किन्स अँड विलने करुणा सिंधू आणि अँटिलिया येथील मुलांसाठी नर्सरीची रचना करण्यात आली आहे. त्यांच्याकडे फिरणारे पलंग आणि स्वयंचलित छप्पर आहेत जेणेकरुन मुलांना नैसर्गिक सूर्यप्रकाशाचा आनंद घेता येईल. नर्सरीमधील सर्व फर्निचर हे लोरो पियाना, हर्मीस आणि डायर सारख्या मोठ्या ब्रँड्सपासून बनवलेले आहे. ईशाच्या मुलांनी डोल्से अँड गब्बाना, गुच्ची आणि लोरो पियाना या जगप्रसिद्ध फॅशन डिझाईन ब्रँडचे कपडे घातले आहेत. इतकंच नाही तर त्यांना BMW च्या खास डिझायनर कार सीटवर बसवलं जाईल.