IPL Auction 2023 : ना नाव ऐकलं ना गाव, 13.25 कोटींचा जॅकपॉट लागलेला Harry Brook आहे तरी कोण ?

ipl-auction-2023-:-ना-नाव-ऐकलं-ना-गाव,-13.25-कोटींचा-जॅकपॉट-लागलेला-harry-brook-आहे-तरी-कोण-?

Harry Brook sold to Sunrisers Hyderabad: अखेरच्या षटकात मैदानात उतरून समोरच्या गोलंदाजाच्या नांग्या ठेचण्याचं काम करणाऱ्या हॅरी ब्रुक्स पाकिस्तानविरुद्ध वादळी खेळी केली होती. त्यावेळी…

Updated: Dec 23, 2022, 05:59 PM IST

IPL 2023 Auction Harry Brook Price : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या (T20 world Cup) आधी इंग्लंड (England) संघाची ज्यावेळी घोषणा झाली त्यावेळी एका 23 वर्षाच्या खेळाडूला संधी देण्यात आली. 23 वर्षांचं पोरगं वर्ल्ड कप खेळणार ही बातमी माध्यमांमध्ये पसरली त्यावेळी अनेकांच्या भूवया उंचावल्या. हा खेळाडू आहे तरी कोण?, असा सवाल विचारला जात असताना सर्वांच्या तोंडी एकच नाव होतं. ते म्हणजे हॅरी ब्रुक्स (Harry Brook)…

जॉस बटलर, जॉनी बेयरस्टो, अॅलेक्स हेल्स, जेसन रॉय आणि लियम लिविंगस्टन यांसारख्या तगड्या खेळाडूंच्या तालमीत तयार झालेल्या हॅरी ब्रुक्स (Harry Brook) पाकिस्तानचं पानीपत केलं होतं. अखेरच्या षटकात मैदानात उतरून समोरच्या गोलंदाजाच्या नांग्या ठेचण्याचं काम करणाऱ्या हॅरी ब्रुक्स पाकिस्तानविरुद्ध वादळी खेळी केली होती. त्यावेळी त्याने 200 च्या स्टाईक रेटने रन कुटले होते. याच हॅरी ब्रुक्सला आयपीएलमध्ये (IPL) लॉटरी लागल्याचं पहायला मिळतंय. (IPL Auction 2023 Harry Brook sold to Sunrisers Hyderabad for Rs 13.25 crore marathi news)

What do you make of this buy folks?

Congratulations to Harry Brook who joins @SunRisers #IPLAuction | @TataCompanies pic.twitter.com/iNSKtYuk2C

— IndianPremierLeague (@IPL) December 23, 2022

23 वर्षीय इंग्लंडच्या फलंदाज हॅरी ब्रूक्सला सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) तब्बल 13 कोटी 25 लाख रुपयांना विकत घेतले आहे. हॅरी ब्रूक्सला आपल्याकडे घेण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स (Rajastan Royals) यांच्यात रस्सीखेच सुरू होती. बघता बघता बोली 10 कोटींवर गेली. अखेर हैदराबादने ब्रूक्सवर 13.25 कोटींची बोली लावली आणि राजस्थान रॉयल्सला माघार घ्यावी लागली.

आणखी वाचा – IPL 2023 Auction : आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली; Sam Curran ‘इतक्या’ कोटींत पंजाबच्या ताफ्यात!

दरम्यान, आत्तापर्यंत 20 टी-ट्वेंटी सामने खेळणाऱ्या 372 धावा केल्या आहेत. 137 च्या स्टाईक रेटने बोक्सने धावा चोपल्या आहेत. तर यात त्याने 30 चौकार तर 15 गगनचुंबी षटकार खेचले आहेत. तर आत्तापर्यंत 4 टेस्टमध्ये 3 शतक देखील झळकावली आहेत. त्यामुळे त्याला टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये संधी मिळाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *