IPL Auction 2023: टीम इंडियाच्या

ipl-auction-2023:-टीम-इंडियाच्या

IPL Auction 2023: खरेदी दूर राहिली, त्याला साधा कोणी भाव दिला नाही, कोण आहे तो? लिलावात सगळ्याच टीम त्याच्यावर बोली लावायच्या. पण वेळ बदलली.

IPL Auction 2023: टीम इंडियाच्या 'या' बॉलरच IPL करिअर संपलं, ऑक्शनमध्ये सगळ्यांनीच त्याच्याकडे फिरवली पाठ

team india

Image Credit source: बीसीसीआय

Team India: टीम इंडियाच्या एका जबरदस्त वेगवान गोलंदाजाच IPL करिअर आता जवळपास संपल्यात जमा आहे. IPL 2023 च्या लिलावात या वेगवान गोलंदाजाला कोणीच भाव दिला नाही. सर्वच फ्रेंचायजीने त्याच्याकडे पाठ फिरवली. कधी काळी आयपीएलमधला हा सर्वात धोकादायक गोलंदाज समजला जायचा. लिलावात सगळ्याच टीम त्याच्यावर बोली लावायच्या. पण वेळ बदलली. आयपीएल 2023 साठी या गोलंदाजावर कोणीच बोली लावली नाही.

त्याचं IPL करिअर संपलं

29 वर्षाचा घातक स्विंग गोलंदाज संदीप शर्माला आयपीएल 2023 साठी झालेल्या लिलावात कोणीच विकत घेतलं नाही. खरेदी करणं दूर राहिलं, कुठल्या टीमने त्याला साध भावही दिला नाही. युवा वेगवान गोलंदाज संदीप शर्मासाठी ही निराशाजनक बातमी आहे. संदीप शर्मा आयपीएलमध्ये 104 सामने खेळलाय. 114 विकेट त्याने काढलेत. 20 धावा देऊन 4 विकेट ही आयपीएलमधली त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

….म्हणून सगळ्यांनीच फिरवली पाठ

IPL 2023 च्या लिलावात संदीप शर्माची बेस प्राइस 50 लाख रुपये होती. पण कुठल्याही टीमने या खेळाडूला विकत घेतलं नाही. संदीप शर्मा मागच्या सीजनमध्ये पंजाब किंग्सकडून खेळला होता. पण त्याची कामगिरी खूपच खराब होती. संदीप शर्माने आयपीएल 2022 मध्ये 5 सामन्यात फक्त 2 विकेट घेतल्या. संदीप शर्माची हीच कामगिरी लक्षात घेऊन पंजाब किंग्सने त्याला यावर्षी रिलीज केलं. संदीप शर्माने आयपीएल 2023 साठी नाव दिलं. पण सर्वांनी त्याच्याकडे पाठ फिरवली.

आंतरराष्ट्रीय करिअर आधीच संपलय

संदीप शर्मा भारताकडून दोन टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळला. संदीप शर्मा 2015 साली झिम्बाब्वे विरुद्ध हरारे येथे पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. या सीरीजमध्ये त्याला दोन T20 सामन्यात संधी मिळाली. पण त्यानंतर पुन्हा कधी टीम इंडियात संधी मिळाली नाही. संदीप शर्माने भारताकडून खेळताना दोन टी 20 सामन्यात एक विकेट घेतलाय. संदीप शर्माच आंतरराष्ट्रीय करिअर आधीच संपल्यात जमा होतं. आता आयपीएल करिअरही त्याच वाटेवर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *