iPhone 13 वर 27 हजार रुपयांचं बंपर डिस्काउंट, अवघ्या काही दिवसांचा अवधी

iphone-13-वर-27-हजार-रुपयांचं-बंपर-डिस्काउंट,-अवघ्या-काही-दिवसांचा-अवधी

iPhone 13: आयफोन चाहते कायम सेल्सची वाट पाहात असतात. कारण मोठं डिस्काउंट मिळत असल्याने गॅझेट्सच्या किमती आवक्यात येतात. iPhone 13 वर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे. चला तर जाणून घेऊयात या ऑफरचा फायदा कसा घेता येईल. 

Updated: Dec 19, 2022, 06:31 PM IST

iPhone 13 Lowest Price Ever: ऑनलाईन खरेदी वेबसाईटवर अनेक ऑफर्स असतात. यामुळे पैशांची बचत तर होतेच त्यासोबत हवी असलेली वस्तू कमी किमतीत मिळाल्याचं समाधान मिळतं. ई कॉमर्स साईट फ्लिपकार्टवर बिग सेविंग्स डेज सेल सुरु आहे. हा सेल 16 डिसेंबरपासून सुरु असून 21 डिसेंबरला संपणार आहे. या सेल दरम्यानं स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही आणि काही इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे महागडे इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स स्वस्तात मिळत आहेत. दुसरीकडे आयफोन चाहते कायम या सेल्सची वाट पाहात असतात. कारण मोठं डिस्काउंट मिळत असल्याने गॅझेट्सच्या किमती आवक्यात येतात. iPhone 13 वर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे. चला तर जाणून घेऊयात या ऑफरचा फायदा कसा घेता येईल. 

iPhone 13 Offers And Discounts

iPhone 13 ची लाँचिंग किंम 69,900 रुपये इतकी आहे. पण पैशांची बचत करायची असेल तर फ्लिपकार्टवर हा फोन स्वस्तात मिळत आहे. फ्लिपकार्टवर 62999 रुपयात हा फोन मिळत आहे. या फोनवर 9 टक्के डिस्काउंट मिळत आहे. या व्यतिरिक्त बँक आणि एक्सचेंज ऑफर मिळत आहे. त्यामुळे या फोनची किंमत आणखी कमी होऊ शकते. जर फ्लिपकार्ड अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डवर वापर करून हा फोन घेतला तर 3150 रुपयांचं डिस्काउंट मिळेल. त्यानंतर ही किंमत 59849 इतकी होईल. यानंतर एक्सजेंच ऑफरचा फायदा घेऊ शकता. 

बातमी वाचा- नववर्ष 2023 मध्ये WhatsApp मध्ये होणार बदल, कॉल रेकॉर्डिंगपासून मिळणार इतर सुविधा

iPhone 13 Exchange Offer

iPhone 13 वर 17500 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळते. जर तुम्ही तुमचा जुना फोन दिला तर इतकी सूट मिळेल. पण यासाठी तुमचा फोन चांगल्या कंडिशनमध्ये असणं आवश्यक आहे. तसेच मॉडेल लेटेस्ट असणं आवश्यक आहे. जर पूर्ण सूट मिळाली तर हा फोन तुम्हाला 42349 रुपयांना मिळेल. म्हणजेच या फोनवर तुम्हाला 27 हजार रुपयांची सूट मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *