iPhone चोरायला आला होता, पण..; तरुणीचं ते एक वाक्य ऐकताच चोराने ठोकली धूम

iphone-चोरायला-आला-होता,-पण.;-तरुणीचं-ते-एक-वाक्य-ऐकताच-चोराने-ठोकली-धूम

नवी दिल्ली 11 डिसेंबर : एका मुलीने उघड केलं की तिनं खोटं बोलून तिचा नवीन आयफोन चोरी होण्यापासून कसा वाचवला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तरुणीने सांगितलं की, ती एका बॉक्समध्ये फोन घेऊन घरी परतत होती. तेव्हा एका व्यक्तीची नजर त्याच्यावर पडली. पण त्याने आयफोन हिसकावण्यापूर्वीच या तरुणीने त्या बॉक्समध्ये तिच्या आईच्या अस्थी असल्याचं खोटं सांगितलं. हे ऐकून चोर तिथून लगेचच निघून गेला.

155 महिलांना डेट करत त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये लुटले; अखेर Romance Scammer ला मिळालं कर्माचं फळ

टिकटॉकवरील ही अमेरिकन तरुणी मॅडी बी वेब नावाने प्रसिद्ध आहे. इथे तिचे 20 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. मॅडीने अलिकडेच तिच्या टिकटॉक व्हिडिओमध्ये खुलासा केला आहे की तिने खोटी कथा सांगून एका चोराला आयफोन चोरण्यापासून थांबवलं. मॅडीने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं – मी खरंच खोटं बोलून स्वतःला लुटण्यापासून वाचवलं. बॉक्समध्ये आयफोन होता.

मॅडीने सांगितलं की तिने नवीन फोन ऑर्डर केला होता. ती तो घेण्यासाठी घराबाहेर गेली. त्यानंतर एक संशयित तिच्याभोवती घिरट्या घालू लागला. तो एका झटक्यात फोन हिसकावण्याचा प्रयत्न करत होता. त्याने बाजूला येऊन तिला विचारलं, की बॉक्समध्ये काय आहे. मात्र मॅडीने बॉक्समध्ये तिच्या आईच्या अस्थी असल्याचं सांगताच चोर पळून गेला.

‘आई-बाबा घरी नाहीत, तू ये..’; प्रेयसीने बोलावताच तिच्याकडे गेला अन् तरुणासोबत भयानक घडलं

प्रत्यक्षात मॅडीची आई जिवंत आणि बरी आहे. चोरी टाळण्यासाठी मॅडी खोटं बोलली. याबद्दल तिनं खंतही व्यक्त केली आहे. आता मॅडीची ही गोष्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. व्हिडिओमध्ये ती तिची गोष्ट भावूकपणे सांगत आहे. टिकटॉकवर तिचा व्हिडिओ 2.3 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. यावर हजारो युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *