पुढारी ऑनलाईन डेस्क : प्राचीन काळातील ग्रंथांमधील व्याकरणातील समस्या सोडविणे हे सर्वात अवघड काम आहे. पाणिनी ऋषी यांच्या संस्कृत भाषेतील व्याकरणाच्या शब्दांचे अर्थ समजणे खूप अवघड आहे. केंब्रिज विद्यापीठातील एका पिएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांने या व्याकरणातील शब्दांचे अर्थ समजून घेण्याविषयीचे संशोधन केले आहे. ५ व्या शतकातील या व्याकरणातील समस्येचा तिडा सुटणारा नव्हता, तो या विद्यार्थ्याने सोडविला आहे. ऋषी रजपूत (वय, २७) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. दोन ते दीड हजार वर्षांपूर्वी ऋषी पाणिनी यांचा प्राचीन संदर्भामध्ये यांचा उल्लेख आढळतो.

अष्टाध्यायी पाणिनी या त्यांच्या व्याकरणामध्ये काही नियम पहायला मिळतात. या नियमांच्या आधारे नवीन शब्दांची निर्मिती करण्याचा प्रयत्न अनेक संशोधकांनी केला आहे. मात्र अजूनपर्यंत कोणत्याही संशोधकाला यामध्ये पूर्णपणे यश आलेले नव्हते. ऋषी रजपूत या विद्यार्थ्याने मात्र या अष्टाध्यायी  पाणिनी पासून शब्दनिर्मिती करण्यामध्ये यश संपादन केले आहे.

पाणिनीचे दोन किंवा अधिक नियम हे एकाच वेळी लागू होतात, परिणामी या नियमांमध्ये तफावत जाणवते. पाणिनीने याबाबत “मेटारूल” सांगितलेले आहे, ज्याचा संशोधक पारंपरिकपणे अर्थ लावण्यासाठी वापर करु शकतील. पाणिनीमध्ये दिलेल्या माहितीनुसार एखाद्या शब्दाच्या डाव्या आणि उजव्या बाजूंना लागू होणाऱ्या नियमांचा अभ्यास ऋषी रजपूत यांनी केला आहे.

हेही वाचा

  • Nirav Modi Extradition : लंडनच्या उच्च न्यायालयाने नीरव मोदीची प्रत्यार्पणाविरोधातील याचिका फेटाळली
  • Birth On Plane : बापरे..! गर्भवती असल्‍याचे माहिती नसलेल्या तरुणीची विमानात प्रसूती
  • Bajrakitiyabha Heart Attack : थायलंडच्या राजकुमारीला हृदयविकाराचा तीव्र झटका