Indian Railways : रेल्वेचे ज्येष्ठ नागरिकांना गिफ्ट! प्रवास सवलत बंद करण्यावरुन ओढावलेली नाराजी करणार दूर, आता मिळणार ही सूट

indian-railways-:-रेल्वेचे-ज्येष्ठ-नागरिकांना-गिफ्ट!-प्रवास-सवलत-बंद-करण्यावरुन-ओढावलेली-नाराजी-करणार-दूर,-आता-मिळणार-ही-सूट

Indian Railways : रेल्वे मंत्रालय ज्येष्ठ नागरिकांना मोठं गिफ्ट देणार आहे..

Indian Railways : रेल्वेचे ज्येष्ठ नागरिकांना गिफ्ट! प्रवास सवलत बंद करण्यावरुन ओढावलेली नाराजी करणार दूर, आता मिळणार ही सूट

सवलतीचा पाऊस

Image Credit source: सोशल मीडिया

नवी दिल्ली : रेल्वेने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना (senior citizens) रेल्वे मंत्रालय लवकरच मोठं गिफ्ट देणार आहे. कोरोना काळात प्रवासाची सवलत बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्यात केंद्र सरकारने हा निर्णय परत घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे ज्येष्ठ नागरीक नाराज झाले होते. पण लवकरच ज्येष्ठ नागरिकांना प्रवास सवलत देण्यात येणार आहे. याविषयीच्या सवलतीबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी माहिती दिली.

रेल्वे मंत्रालय लवकरच ज्येष्ठ नागरिकांना प्रवास सवलत देणार आहे. रेल्वे वरिष्ठ नागरिकांना त्यांची प्रवास सवलत (Railway Concession to Senior Citizen) परत देणार आहे. पण यामध्ये एक ट्विस्ट आहे. सवलतीच्या पात्रतेचे मापदंड बदलण्यात येणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, रेल्वे बोर्ड ज्येष्ठ नागरिकांच्या वयामध्ये बदल करण्याची योजना तयार करण्यात येत आहे. काही श्रेणीसाठी रेल्वे तिकिटात ही सवलत मिळणार आहे. पूर्वी सर्व श्रेणीसाठी रेल्वे तिकिटात सवलत देण्यात येत होती.

रेल्वे बोर्डाने स्पष्ट केले आहे की, ज्येष्ठ नागरिकांना सवलत देण्याविषयीची योजना तयार करण्यात येत आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना सवलत मिळणार आहे. परंतु, सवलत देण्यात काही अटी घालण्यात येणार आहे. पण अद्याप याविषयीचे नियम आणि शर्ती तयार करण्यात आलेल्या नाहीत.

रेल्वे मंत्रालयाने (Ministry Of Railways) दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांना रेल्वेच्या भाड्यात 53 टक्के सवलत देण्यात येते. यासोबतच दिव्यांग, विद्यार्थी आणि रुग्णांसाठी प्रवास भाड्यात सवलत देण्यात येते.

लोकसभेत रेल्वेमंत्री वैष्णव यांनी रेल्वे प्रवासावर सवलत मिळण्याबाबतच्या प्रश्नावर त्यांनी ही माहिती दिली होती. रेल्वे तिकिटावर सवलत देण्यात येणार आहे. वैष्णव यांनी 2019-20 मध्ये रेल्वेच्या प्रवास सवलतीवर 59,837 कोटी रुपये खर्च केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *