IND vs SL: श्रीलंकेविरुद्ध T20 सीरीजसाठी मुंबईच्या

ind-vs-sl:-श्रीलंकेविरुद्ध-t20-सीरीजसाठी-मुंबईच्या

IND vs SL: श्रीलंकेविरुद्धच्या या सीरीजसाठी टीम इंडियात कोणते मोठे बदल दिसू शकतात? कसा असेल टीम इंडियाचा स्क्वॉड.

India vs Sri lanka, T20 Series: श्रीलंकेविरुद्धच्या T20 सीरीजने टीम इंडियाची नव्या वर्षाची सुरुवात होणार आहे. या सीरीजमध्ये टीम इंडिया तीन टी 20 सामने खेळणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या या सीरीजसाठी मंगळवारी टीम इंडियाची निवड होऊ शकते. 3 ते 7 जानेवारी दरम्यान टीम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये तीन टी 20 सामन्यांची सीरीज खेळली जाईल. श्रीलंकेविरुद्धच्या या सीरीजमध्ये हार्दिक पंड्या टीम इंडियाच नेतृत्व करताना दिसेल.

बीसीसीआय ‘हा’ धोका पत्करणार नाही

नियमित कर्णधार रोहित शर्मा अजूनही अंगठ्याच्या दुखापतीमधून पूर्णपणे सावरलेला नाहीय. बीसीसीआयला रोहितच्या पुनरागमनाची घाई करुन कुठलाही धोका पत्करायचा नाहीय. श्रीलंकेविरुद्धच्या टी 20 सीरीजसाठी स्टार बॅट्समन विराट कोहलीला विश्रांती दिली जाऊ शकते. रोहित शर्माची सुद्धा या सीरीजमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे. केएल राहुल जानेवारीमध्ये लग्न करणार आहे. पण या सीरीजसाठी त्याला सुद्धा टीममधून ड्रॉप करण्यात येऊ शकतं.

मुंबईच्या खेळाडूला संधी मिळेल?

श्रीलंकेविरुद्धच्या T20 सीरीजमध्ये सिनियर खेळाडू खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे अनेक युवा खेळाडूंसाठी नशिबाचे दरवाजे उघडले जाऊ शकतात. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत सलामीच्या जागेसाठी पृथ्वी शॉ ला संधी मिळू शकते. शुभमन गिलला केएल राहुलच्या जागी संधी मिळू शकते. तिसरा ओपनर म्हणून इशान किशनचाही पर्याय आहे. इशान किशन टीममध्ये आला, तर डावखुऱ्या ओपनरशिवाय विकेटकीपरचा ऑप्शनही मिळतो.

असा असू शकतो टीम इंडियाचा स्क्वॉड

सूर्यकुमार यादवही टीममध्ये असेल. श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा आणि ऋषभ पंत यांना मिडल ऑर्डरमध्ये संधी मिळू शकते. ऋषभ पंत विकेटकीपर फलंदाज म्हणून टीम इंडियाची पहिली पसंत असेल. श्रीलंकेविरुद्धच्या या सीरीजसाठी ऑलराऊंडर म्हणून हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जाडेजा आणि शार्दुल ठाकूरला संधी मिळू शकते. स्पिन गोलंदाजीत अक्षर पटेल, युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादवचा पर्याय आहे. वेगवान गोलंदाजीत अर्शदीप सिंह, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल आणि उमरान मलिकला संधी मिळू शकते.

श्रीलंकेविरुद्ध T20 सीरीजसाठी टीम इंडियाचा संभाव्य स्क्वॉड

शुभमन गिल, पृथ्वी शॉ, इशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कॅप्टन), ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंगटन सुंदर, हर्षल पटेल, शार्दुल ठाकुर, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, दीपक हुड्डा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अक्षर पटेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *