Ind vs Ban : विराट कोहली बांगलादेशी खेळाडूवर भडकला, VIDEO आला समोर

ind-vs-ban-:-विराट-कोहली-बांगलादेशी-खेळाडूवर-भडकला,-video-आला-समोर

Ind vs Ban Test Match : टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा पहिला डाव 314 धावावर आटोपला होता. यानंतर बांगलादेश मैदानात बॅटींगसाठी उतरली होती. दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात बांगलादेश बॅटींग करत होती. 

Updated: Dec 24, 2022, 01:58 PM IST

Ind vs Ban Test Match : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli)  बॅटीने जितकं आक्रमक खेळतो, तितकचं आक्रमक तो खेळाडूंसोबत वागताना दिसला आहे. आता शुक्रवारच उदाहरण घ्याना विराट रिषभ पंतवर भडकला होता. शेवटच्या चेंडूवर एक रन काढण्यास नकार दिल्याने तो भडकला होता. या संदर्भातला व्हिडिओही समोर आला होता. आता असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत विराट (Virat Kohli) बांगलादेशी खेळाडूवर भडकल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. 

व्हिडिओत काय? 

टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा पहिला डाव 314 धावावर आटोपला होता. यानंतर बांगलादेश मैदानात बॅटींगसाठी उतरली होती. दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात बांगलादेश बॅटींग करत होती. यावेळी बांगलादेशचे सलामीचे खेळाडू वेळकाढूपणा करत होते.जेणेकरून दुसरा दिवस संपेल आणि सामना ड्रॉ च्या दिशने ढकलता येईल. विराटने (Virat Kohli)  बांगलादेशची हीच चुक पकडत त्यांना मैदानात सुनावले होते. 

शांटोला मैदानात सुनावले

तिसऱ्या सत्रात बांगलादेशचा संघ बॅटींगला उतरला होता. दरम्यान, नॉन स्ट्राइकला उभा असलेला शांटो त्याच्या बुटाच्या लेस बांधत होता. यावेळी काही खेळाडू डगआऊटमधून ड्रीक्स घेऊन पोहोचले होते. यावेळी 6 ओव्हर होऊन गेली होती आणि हळूहळू अंधार पडत होता.त्यामुळे बांगलादेशचे खेळाडू वेळकाढूपणा करत होते. त्यावेळी विराटने शांटोला ‘तुझा शर्ट पण घे’ असे म्हणत त्याला टोला लगावला होता. खेळाला उशीर होऊ नये आणि लवकरात लवकर षटक पूर्ण व्हावेत, अशी कोहलीची इच्छा होती. त्यामुळे तो संतापला होता. 

pic.twitter.com/NklYyAlETu

— Guess Karo (@KuchNahiUkhada) December 23, 2022

पंतवरही भडकला होता

दुसऱ्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी विराट कोहली (Virat Kohli) ऋषभ पंतवर (Rishabh Pant) भडकला होता. त्याच झालं अस की, कोहलीने मेहदी हसन मिराझने टाकलेल्या बॉलला ऑन-साइडला थोडा धक्का दिला आणि एकेरी धाव काढायला सुरुवात केली. पण पंतने त्याला प्रतिसादच दिला नाही. तो नॉन स्ट्राईकवर उभाच राहिला. त्यामुळे क्रिझ सोडलेल्या विराटला डाईव्ह मारून स्वत:ची विकेट वाचवावी लागली होती. या दरम्यान तो जखमी होण्याची शक्यता होती. 

दरम्यान तिसऱ्या दिवशी बांगलादेश दुसऱ्या डावात 7 विकेट गमावून 200 धावांच्या नजीक पोहोचत आहे. टीम इंडियाला फक्त 3 विकेट घेऊन बांगलादेशने दिलेल टार्गेट पुर्ण करायचे आहे. असे करून टीम इंडिया 2-0 न टेस्ट सामने जिंकेल. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *