IND vs BAN: टीम इंडियाला धक्क्यावर धक्के; रोहित शर्मानंतर अजून एक खेळाडू संघातून 'आऊट'!

ind-vs-ban:-टीम-इंडियाला-धक्क्यावर-धक्के;-रोहित-शर्मानंतर-अजून-एक-खेळाडू-संघातून-'आऊट'!

Shubman Gill Injured before IND vs BAN 1st Test: पहिला कसोटी सामन्याला काही तास शिल्लक असताना टीम इंडियाला आणखी एक मोठा धक्का बसलाय. भारतीय संघाला वनडे मालिकेत एकामागून एक सहा धक्के बसलेत.

Updated: Dec 13, 2022, 11:28 PM IST

IND vs BAN 1st Test : टीम इंडिया सध्या बांग्लादेश (India Tour Of Bangaladesh) दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टीम इंडियाने (Indian Cricket Team) वनडे सीरिज गमावली आहे. आता त्यानंतर 14 डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. त्याआधी टीम इंडियासाठी वाईट बातमी समोर आली आहे. रोहित शर्मानंतर (Rohit Sharma) अजून एक खेळाडू जखमी झाला आहे. (IND vs BAN 1st Test another big blow for india Shubman Gill Injured before match after rohit sharma marathi news)

पहिला कसोटी सामन्याला काही तास शिल्लक असताना टीम इंडियाला आणखी एक मोठा धक्का बसलाय. भारतीय संघाला वनडे मालिकेत एकामागून एक चार धक्के बसलेत. यामध्ये रोहित शर्मा , रिषभ पंत, दीपक चहर आणि कुलदीप सेन यांचं नाव सामील आहे. त्यानंतर मोहम्मद शमी (Mohammed Shami) देखील जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आणखी एक खेळाडू जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.

पहिल्या कसोटीसाठी सराव करत असताना आता शुभमन गिलच्या (Shubman Gill) हाताला गंभीर दुखापत झाली आहे. दुखापतीनंतर गिलने सराव करताना दिसला नाही. त्यामुळे शुभमन गिल (Shubman Gill Injured) पहिल्या सामन्यात खेळणार की नाही, यावर अद्याप प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

आणखी वाचा – IPL 2023: टीम इंडियामध्ये स्थान मिळालं नाही, आता आयपीएलमध्ये लाख सोडा…कोटींची बोली लागणार!

दरम्यान, यजमान संघाला देखील मोठा धक्का बसल्याचं पहायला मिळतंय. बांग्लादेश संघाचा कर्णधार शाकिब अल हसनच्या (shakib al hassan) खेळण्याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. शाकिबला खांद्याच्या दुखापतीमुळे रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यामुळे शाकिबच्या दुखापतीमुळे तो उद्याच्या सामन्यात खेळणार की नाही याबाबत काही स्पष्टता नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *