IND vs BAN: कसोटी मालिकेपूर्वी बांगलादेशला मोठा धक्का बसण्याची शक्यता, महत्त्वाचा खेळाडू जखमी झाल्याने रुग्णालयात

ind-vs-ban:-कसोटी-मालिकेपूर्वी-बांगलादेशला-मोठा-धक्का-बसण्याची-शक्यता,-महत्त्वाचा-खेळाडू-जखमी-झाल्याने-रुग्णालयात

कसोटी मालिकेपूर्वी बांगलादेशला टीमचा दिग्गज खेळाडू जखमी झाल्यामुळे रुग्णालयात दाखल

IND vs BAN: कसोटी मालिकेपूर्वी बांगलादेशला मोठा धक्का बसण्याची शक्यता, महत्त्वाचा खेळाडू जखमी झाल्याने रुग्णालयात

IND VS BAN TESH MATCH

Image Credit source: twitter

मुंबई : टीम इंडिया (IND) आणि बांगलादेश (BAN) यांच्यात उद्यापासून कसोटी मालिका (Test Series) सुरु होणार आहे. टीम इंडियाचे अनेक दिग्गज खेळाडू जखमी झाल्यामुळे युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे केएल राहूल याला टीम इंडियाचे कर्णधारपद देण्यात आले आहे, त्यामुळे टीम इंडिया क्रमवारी बदलणार आहे. उद्या चाहत्यांना टीम इंडियामध्ये मोठा बदला पाहायला मिळणार आहे.

बांगलादेश टीमचा कर्णधार शाकिब अल हसन हा जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो सराव करीत असताना त्याला दुखापत झाली आहे. ज्यावेळी तो जखमी झाला, त्यावेळी त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी अॅम्बुलन्स बोलवण्यात आली होती. ज्यावेळी त्याची चाचणी करण्यात आली, त्यानंतर तो पुन्हा अॅम्बुलन्समधून मैदानात परतला.

कसोटी मालिकेसाठी भारत आणि बांगलादेशचे संघ

भारत – लोकेश राहुल (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, शुभमन गिल, विराट कोहली, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत (विकेट-कीपर), श्रीकर भारत (विकेट-कीपर). कीपर), जयदेव उनाडकट, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव.

बांगलादेश – शकिब अल हसन (कर्णधार), नजमुल हुसेन, मोमिनुल हक, यासिर अली, मुशफिकुर रहीम, लिटन दास, नुरुल हसन, मेहिदी हसन, तैजुल इस्लाम, तस्किन अहमद, खालिद अहमद, इबादत हुसेन, शरीफुल इस्माल, झाकीर हसन, महमुदुल हसन , राजूर रहमान, अनामूल हक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *