Hrithik Roshan | चक्क या कारणामुळे राकेश रोशन ऋतिकला बाॅलिवूडपासून ठेवू इच्छित होते दूर

hrithik-roshan-|-चक्क-या-कारणामुळे-राकेश-रोशन-ऋतिकला-बाॅलिवूडपासून-ठेवू-इच्छित-होते-दूर

मुलगी आणि वडिलांची जोडी म्हणून यांना सोशल मीडियावर तूफान ट्रोल केले जाते.

मुंबई : ऋतिक रोशन हा बाॅलिवूडमधील फेमस हिरो आहे. मात्र, सध्या ऋतिक रोशन हा चित्रपटांपेक्षा जास्त त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत राहतो. गेल्या काही दिवसांपासून ऋतिक हा सबा आझाद हिला डेट करत आहे. परंतू काही लोकांना यांची जोडी आवडत नाही. मुलगी आणि वडिलांची जोडी म्हणून यांना सोशल मीडियावर तूफान ट्रोल केले जाते. बऱ्याच वेळा अशा ट्रोलर्सचा सबा आणि ऋतिक समाचार देखील घेतात. ऋतिक आणि सबा कायमचसोबत स्पाॅट होतात. इतकेच नाहीतर विदेशामध्येसोबतच फिरायला जातात.

ऋतिक रोशन याने सौदी अरेबियातील रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती. यावेळी ऋतिक रोशन याने अनेक विषयांवर चर्चा केली. यावेळी त्याने त्याच्या आगामी चित्रपटाची माहिती देखील शेअर केलीये.

यावेळी बोलताना ऋतिक रोशन याने असे काही सांगितले की, ते ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला. ऋतिक रोशन म्हणाला की, माझ्या वडिलांची (राकेश रोशन) अजिबात इच्छा नव्हती की, मी एक अभिनेता व्हावे आणि बाॅलिवूडच्या चित्रपटामध्ये काम करावे.

माझे वडील कायमच मला बाॅलिवूडपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करायचे. त्यांना कधीच वाटले नाही की, मी एखाद्या मोठ्या चित्रपटात काम करावे. परंतू मी बाॅलिवूडमध्येच आलो आणि हिरो झालो.

माझ्या वडिलांनी बाॅलिवूडमध्ये करिअरला सुरूवात केली त्यावेळी त्यांना खूप जास्त संघर्ष करावा लागला होता. त्यामुळे त्यांना वाटत होती की, मी जे काही सहन केले आहे ते माझ्या मुलाला करायला लागू नये.

आता ऋतिक रोशन याने केलेल्या या विधानाची प्रचंड चर्चा होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच ऋतिक रोशनचा विक्रम वेधा हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, या चित्रपटाला बाॅक्स आॅफिसवर धमाका करण्यात यश मिळाले नाही. या चित्रपटात ऋतिक रोशनसोबतच सैफ अली खान मुख्य भूमिकेत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *