Gram panchayat election results Live : ग्रामपंचायतींच्या निकालात अनेकांना धक्का

maharashtra gram panchayat election results 2022
Maharashtra Gram panchayat election result 2022 : महाराष्ट्रात 7,751 ग्रामपंचायती आणि थेट सरपंच पदासाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या, त्यापैकी काही ठिकाणी बिनविरोध झाल्या…
महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या निकालाची उत्सुकता राजकीय पक्षांसह जनतेलाही होती. प्रतिक्षा संपली असून, मतमोजणी सुरू झालीये. तब्बल 7 हजार 135 ग्रामंपचायतींसाठी मतदान झालं होतं. त्यामुळे या ग्रामपंचायतींमध्ये कुणाला गुलाल उधळण्याची संधी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यांना लागली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता त्यापैकी काही ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य आणि थेट सरपंचपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे राज्यात 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं होतं. ग्रामपंचायत निवडणुका राजकीय चिन्हावर लढवल्या जात नसल्या, तरी स्थानिक नेत्यांसाठी निवडणुकीचे निकाल महत्त्वाचे असणार आहे. त्याचबरोबर कोणता राजकीय पक्ष सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकतोय, याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे.
सातारा ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2022 : या गटांमध्ये लढती
सातारा : छत्रपती उदयनराजे भोसले गट विरुद्ध छत्रपती शिवेंद्रराजे भोसले गट
कराड : माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण गट विरुद्ध भाजपचे अतुल भोसले गट
पाटण : मंत्री शंभूराज देसाई (शिंदे गट शिवसेना) विरुद्ध राष्ट्रवादी सत्यजित पाटणकर गट
कोरेगाव : शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे गट आणि छत्रपती उदयनराजे भोसले गट विरुद्ध राष्ट्रवादी आमदार शशिकांत शिंदे गट आणि भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले गट
फलटण : राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर गट विरुद्ध भाजपा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर गट
माण, खटाव : प्रभाकर देशमुख गट विरुद्ध भाजप आमदार जयकुमार गोरे गट
वाई, खंडाळा : राष्ट्रवादी आमदार मकरंद पाटील गट विरुद्ध भाजपचे मदन भोसले गट
जावली : भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले गट विरुद्ध राष्ट्रवादी आमदार शशिकांत शिंदे, दीपक पवार गट