Gram Panchayat election: सरपंचपदासाठी सासुबाई विरुद्ध सुनबाई थेट लढत, कोण मारणार बाजी?

gram-panchayat-election:-सरपंचपदासाठी-सासुबाई-विरुद्ध-सुनबाई-थेट-लढत,-कोण-मारणार-बाजी?

सरपंचपदासाठी सासू विरुद्ध सून अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. पहिल्यांदाच बोदरा देऊळगावात सासू आणि सून बाई यांच्यात निवडणूक रंगणार आहे.

शाहिद पठाण, गोंदिया : आजपर्यंत घरात सासू-सूनेत वर्चस्वाची लढाई आपन नेहमी पाहिली आहे. मात्र गावाची कारभारींन बनण्यासाठी सासू-सुनेची थेट लढत पहिल्यांदा गोंदियात पहायला मिळत आहे. बोदरा देऊळगाव ग्रामपंचायती निवडणुकीत सासू विरुद्ध सून अशी थेट लढत आहे.

मोरगांव अर्जुनी तालुक्यातील बोदरा देऊळगावात ग्रामपंचायत निवडणुकीची जोरदार चर्चा आहे. येत्या 18 डिसेंबर रोजी 1650 लोकसंख्या असलेल्या या गावाच्या 10 सदस्यीय (9+1) गट ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. 15 वर्षानंतर या ग्रामपंचायतीला अनुसूचित जाती महिला सरपंच पद राखीव झाले आहे. येथे सरपंचपदासाठी सासू- सुनेत थेट लढत होणार आहे. आता गावात प्रभावी महिला शोधून सरपंचपदासाठी उभे करणार म्हणून देऊळगाव येथील मंदा योगिराज ढवळे (सासुबाई) यांना गावातील स्थानिक नेत्यांनी “सर्व धर्म समभाव पॅनल तर्फे सरपंचपदासाठी निवडणुकीत उभे केले.

आपण दिलेली महिला सरपंच होणार असे त्यांना वाटत असताना आपण ही प्रभावी महिला आहोत असे म्हणत सुन बाई कशी मागे राहणार. म्हणून किरण मिलिंद ढवळे (सुनबाई) यांनी ही आपल्या सासु विरुद्ध अपक्ष सरपंचपदासाठी अर्ज भरला. अचानक आपल्या चुलत दिराच्या सुनेने आपल्या विरुद्ध सरपंचपदासाठी अर्ज भरल्याने त्यांना ही धक्का बसला असेल. आता सासू विरुद्ध सुन लढत बोदरा देऊळगाव मध्ये पहायला मिळत आहे.

दोघींचा ही गावात दांगडा प्रस्त असल्याने गावकरी कोणाला मत द्यायचे म्हणून बुचकळ्यात पडले आहे.इतकंच नाही तर ढवळे कुटुंबातील लोकं ही कोणाला मत द्यायचे याबाबत विचारात पडले आहेत. गुप्त मतदान असल्याने नातेवाईकांनी नक्कीच सुटकेचा निश्वास सोडला आहे. नातेवाईकांनी कोणाचाही प्रचारात शामिल न होता सावध पवित्रा घेतला आहे. दोघींना विजयाची आशा आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या दिवशी मतदार कोणावर विश्वास दाखवतात हे पुढे येणार आहे.

सासू-सूनेचा प्रचार जोमात सुरु आहे. गावकऱ्यांना आपण निवडणूक आल्यास काय फायदा होईल याबाबत प्रचार सुरु आहे. दोघांमध्ये “कांटे की टक्कर ” पाहायला मिळत आहे. पण या दोघांसोबत इतर तीन उमेदवार ही सरपंचपदासाठी निवडणूक लढवत असल्याने गावाचे राजकारण तापले आहे. त्यामुळे दोघींच्या लढतीत तिसऱ्याचा लाभ अशीही शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *