Govinda Naam Mera Review : गोविंदा नाम मेरा…! हलका फुलका मसाला चित्रपट

govinda-naam-mera-review-:-गोविंदा-नाम-मेरा…!-हलका-फुलका-मसाला-चित्रपट

News

  • मुख्यपृष्ठ
  • मूव्ही रिव्हिव्ह
  • Govinda Naam Mera Review : गोविंदा नाम मेरा…! हलका फुलका मसाला चित्रपट

Govinda Naam Mera Review  | गोविंदा नाम मेरा चित्रपट मसाला एंटरटेनर आहे. सिनेमात आपल्याला विकी, कियारा, भूमीची नवीन स्टाईल पाहायला मिळेल 

By: अमित भाटीया | Updated at : 16 Dec 2022 10:37 PM (IST)

Edited By: निलेश झालटे

Govinda Naam Mera Review by amit bhatia viki kaushal kiara advani bhoomi pednekar shashank khetan Govinda Naam Mera Review : गोविंदा नाम मेरा...! हलका फुलका मसाला चित्रपट

Govinda Naam Mera Review

गोविंदा नाम मेरा

कॉमेडी ड्रामा

Director: शशांक खेतान

Starring: विकी कौशल, भूमी पेडणेकर, रेणूका शहाणे, कियारा आडवाणी

Govinda Naam Mera Review :आपण अनेक चित्रपट पाहत असतो मात्र काही चित्रपट हे फक्त टाईमपास आणि मनोरंजनासाठी असतात. असे चित्रपट सिनेमागृहात पाहताना डोकं घरी ठेवावं लागतं आणि जर तुम्ही घरी OTT वर चित्रपट बघत असाल तर आपलं डोकं फ्रीजमध्ये ठेवावं लागतं. असं केलं तरच अशा चित्रपटाचा आनंद तुम्हाला घेता येईल. गोविंदा नाम मेरा हा देखील असाच चित्रपट आहे. एक हलका फुलका फुल्ल मसाला  एंटरटेनर असलेला चित्रपट.

कथा- ही कथा आहे गोविंदाची म्हणजेच विकी कौशलची जो एक डान्सर आहे. त्याची पत्नी गौरी म्हणजेच भूमी पेडणेकरसोबत त्याचं आजिबात जमत नाही. त्याची एक मैत्रीण सुक्कू म्हणजेच कियारा अडवाणी. गोविंदाचा सावत्र भाऊ आहे. त्या दोघांमध्ये एका बंगल्यावरुन वाद आहेत. दोघांनाही हा कोट्यवधींचा बंगला हवा आहे दरम्यान, प्रेयसी आणि पत्नीमध्ये अडकलेल्या गोविंदाच्या पत्नीचा खून होतो. गौरीचा खून कोणी केला, बंगला कोणाला मिळणार? आणि पुढे काय होणार यासाठी तुम्ही हा चित्रपट हॉटस्टारवर पाहू शकता.

अभिनय – गोविंदाच्या व्यक्तिरेखेत विकी कौशल खूप चांगला दिसून आला आहे. पंजाबी विकीनं एका मराठी मुलाची व्यक्तिरेखा खूप छान पद्धतीनं साकारली आहे.  विकीने या व्यक्तिरेखेची देहबोली खूप छान पकडली आहे. तो तुम्हाला बऱ्याचदा हसवतो तर अनेकदा बिचारा वाटतो.  विकीचं हे एक वेगळंच पात्र आहे आणि त्याने ते चांगलं निभावलंय.. कियाराने विकीच्या मैत्रिणीचं पात्र खूप छान साकारलंय. तिच्या नकारात्मक छटाही सिनेमात येतात.  विकीच्या शिव्या देणार्‍या बायकोच्या पात्रात भूमी पेडणेकर जरा वरचढ दिसते. विकीच्या आईच्या व्यक्तिरेखेत रेणुका शहाणेने अप्रतिम काम केले आहे. अर्धांगवायू झालेल्या आईचे हे पात्र तिनं छान साकारलं आहे. संपूर्ण फिल्ममध्ये ती व्हील चेअरवर आहे.  

दिग्दर्शन – चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतान यांनी केले आहे. शशांकचे दिग्दर्शन चांगले आहे… चित्रपट चांगल्या गतीने पुढे जातो, सिनेमात बरेचशे ट्विस्टही येतात… तुम्हीही हसाल पण तुम्हाला सिनेमा पाहताना 70 आणि 80 च्या दशकातील सिनेमा पाहतोय की काय असं कुठेतरी जाणवेल.  चोर, पोलीस आणि एकमेकांभोवती गुरफटलेली पात्र. अशी एकंदरीत कथा आहे. 

News Reels

हा सिनेमा म्हणावा तितका ग्रेट नाही.  तुम्हाला यात काही नवीन सापडणार नाही. पण जर तुम्हाला टाईमपाससाठी आणि निव्वळ मनोरंजन करायचे असेल तर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. विकी कौशल, कियारा आणि भूमी यांचे चाहते असाल तर एक चाहता म्हणून आपल्याला हा सिनेमा पाहताना आनंद मिळेल. बाकी जे लोक फक्त मनोरंजनासाठी चित्रपट पाहतात, त्यांना हा चित्रपट आवडेल…

Published at : 16 Dec 2022 10:37 PM (IST) Tags: Kiara Advani Bhoomi Pednekar Govinda Naam Mera Govinda Naam Mera Review Viki Kaushal

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *