Gondia Wall Collapse : जीर्ण घराची भिंत कोसळली, एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

गोरठा येथील नारायण तेजराम ब्राह्मणकर हे आपल्या नोकरासोबत जीर्ण असलेल्या घराच्या विटा काढत होते. दुपारी जेवणाची वेळ झाली म्हणून काम थांबवले आणि ते जेवायला बसले.
गोंदियात भिंत कोसळून एक ठार एक जखमी
Image Credit source: TV9
गोंदिया : जीर्ण झालेल्या घराची भिंत अंगावर कोसळल्याने एका वृद्ध नागरिकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना गोंदियाता आज सकाळी घडली आहे. नारायण ब्राम्हणकर असे 59 वर्षीय मयत व्यक्तीचे नाव आहे. लोकचंद रामा ब्राम्हणकर असे 60 वर्षीय गंभीर जखमीचे नाव आहे. गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील ग्राम गोरठा येथे घडली आहे. याप्रकरणी आमगाव पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच आमगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला.
जीर्ण घराच्या विटा काढत होते दोघे जण
गोरठा येथील नारायण तेजराम ब्राह्मणकर हे आपल्या नोकरासोबत जीर्ण असलेल्या घराच्या विटा काढत होते. दुपारी जेवणाची वेळ झाली म्हणून काम थांबवले आणि ते जेवायला बसले. जेवणानंतर ते थोडा वेळ भिंतीच्या बाजूला बसले आता अचानक ती जीर्ण भिंत पडली.
गंभीर जखमी व्यक्तीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु
यावेळी भिंतीजवळ दबून बसलेले नारायण तेजराम ब्राह्मणकरांचा घटनास्थळावर मृत्यू झाला. तर लोकचंद रामा ब्राम्हणकर हे जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या लोकचंद ब्राह्मणकर यांना गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले.
आमगाव पोलिसात घटनेची नोंद
घटनेची आमगाव पोलिसांत तक्रार नोंद केली असून, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून शवविच्छेदनाकरीता ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे पाठवण्यात आले. पुढील तपास आमगाव पोलीस करत आहेत.
इमारतीचं प्लास्टर कोसळून गाड्यांचं मोठं नुकसान
अंबरनाथमध्ये इमारतीचं प्लॅस्टर सातव्या मजल्यावरून खाली उभ्या असलेल्या गाड्यांवर कोसळल्याने गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अंबरनाथच्या निसर्ग ग्रीन्स सोसायटीत ही घटना घडली असून, याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विकासकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
FjEeRdT6
vzPTIEGT
D5fvobTX
x5R7bbAC
6LYVTQcc
yq5BRgF8
m2D2GaBj
qt3KGSKl
H3Hotjjm
uxd4SUfM