Gmail Down : Google ची जीमेल सेवा ठप्प, असंख्य यूझर्स हैराण

gmail-down-:-google-ची-जीमेल-सेवा-ठप्प,-असंख्य-यूझर्स-हैराण

जीमेल डाऊन झाल्याने जीमेलचं Appआणि डेस्कटॉप व्हर्जनमध्ये अडचणी येत आहेत. 

Updated: Dec 10, 2022, 10:48 PM IST

Gmail Down  :  गूगलची (Google) ईमेल सेवा देणारं जीमेल (Gmail) डाऊन झालंय. यूझर्सना जीमेल वापरताना अडचणींचा सामना करावा लागलाय. जीमेल डाऊन झाल्याचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. मात्र जीमेल डाऊन झाल्याने जीमेलचं App आणि डेस्कटॉप व्हर्जनमध्ये अडचणी येत आहेत. यामुळे असंख्य यूझर्सना मनस्ताप सहन करावा लागतोय. (google gmail email app and desktop version service down for several users)

Google’s email service Gmail is down for several users. Both, app and desktop version of Gmail is affected. pic.twitter.com/F9EB3x6xZU

— ANI (@ANI) December 10, 2022

भारतात अनेक यूझर्सनी मेल पाठवायला आणि मिळवायला अडचण येत असल्याचं म्हणंन आहे. डाऊनडिटेक्टर या वेबसाईटनुसार, भारतात रात्री 8 वाजून 30 मिनिटांपासून जीमेल डाऊन झाल्याची माहिती आहे. जगात जवळपास 1.5 अब्ज यूझर्स आहेत. दरम्यान गेल्या वर्षी 2021 मध्ये 14 सप्टेंबरला अशाच पद्धतीने जीमेल सेवा ठप्प झाली होती. गेल्या वेळेस गूगलसह अन्य सेवा या जवळपास 45 मिनिटांसाठी प्रभावित झाल्या होत्या. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *